Breaking News

अवैध धंदा करणाऱ्या बद्दल तक्रार करणे चुक आहे काय?

त्या सट्टा धारकांना वाचण्यासाठी काही लोकांचा खटाटोप 

अवैध धंदा करणाऱ्या बद्दल तक्रार करणे चुक आहे काय?


महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी,चंद्रपूर : कोरपना येथे काही महिन्यापासून अवैधरित्या मुस्लिम ईदगाह येथे सट्टापट्टी सुरू आहे या सट्टापट्टी चा मूळ कर्णधार चंद्रपूर येथील पत्रकार असून त्यांनी मोठ्या प्रमाणात सटयाचा व्यवसाय ठाटला आहे याबद्दल वारंवार  तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेत नसल्याने कोरपना तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोबीन यांनी संबंधीच्या सट्टा किंग ची तक्रार केली आपला धंदा बंद होण्याकरिता विनाकारण चे बदनामीकारक फेसबुक वर व्हाट्सअप वर टाकून बदनामी करण्याचा कारस्थान बसत आहे.


 सदर हा सट्टा किंग याच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असून त्याची दहशत कोरपना तालुक्यात करण्याचे काम करत आहेत यामुळे तालुक्यातील काही महिला माझ्याकडे आले व सुरू असलेला उद्या जवळील सट्टा बंद करण्याची विनंती केली व मी बंद करण्यासाठी त्यांना सहकार्य केलं याच भावनेतून हा सट्टा माफिया माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असून या विरोधात मी कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे मी समाजसेवक असुन समाजाची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे मात्र अशा अवैध धंदेवाल्यांना जर कोणी पाठीशी घालत असेल तर त्याला त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत