Breaking News

दहा मोर एकाच वेळी मृतावस्थेत आढळले, वन विभागात एकच खळबळ

 मनाला चटका लावणारी घटना

दहा मोर एकाच वेळी मृतावस्थेत आढळले, वन विभागात एकच खळबळ


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नाशिक :
नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील शिवारात दहा मोर मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या मोरांच्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली असून विषबाधेमुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमोदे शिवारातील गिरणा मन्याड नदीचे पात्र असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोरांची संख्या या ठिकाणी वाढलेली होती अन्न आणि पाण्याच्या शोधात हे मोर या भागात मोठ्या संख्येने येतात शनिवारी या भागात अन्न पाण्यासाठी दाखल झालेल्या मोरांचा तडफडून मृत झाला दहा मोरांचा मृत्यू ने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत्यू झालेल्या मध्ये 46 मादी यांचा समावेश आहे वृद्ध झालेल्या मुलांचे विच्छेदन जळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात होणार आहे अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

अमोदे परिसरात सध्या पेरणीची कामे चालू असून कपाशी आणि मका पेरणी चालू आहे अशातच अन्नपाण्याचा शोधार्थ आलेल्या मोरांनी पिक पेरा खाल्ल्याने विषबाधेमुळे मृत्यू झालेले झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरे कारण सांगता येईल असे आरएफओ चंद्रकांत कासार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत