Breaking News

गावात व गावालगत घाणीचे साम्राज्य,काही ठिकाणी धार्मिक स्थळी अस्वच्छतेतून विटंबना

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मोहिमेचे भिजत घोंगडे 

 गावात व गावालगत घाणीचे साम्राज्य,काही ठिकाणी धार्मिक स्थळी अस्वच्छतेतून विटंबना  

खंडविकास अधिकारी यांचे तक्रारीकडे दुर्लक्षित धोरण,निलंबनाची मागणी 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण जनतेच्या आरोग्यमान उंचावण्यासाठी सन 2000 - 2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत असताना या अभियानाअंतर्गत जनजागृती चा व्यापक कार्यक्रम अमलात आणण्यात आला त्यामधून लोकांच्या पुढाकारामध्ये शासनाचा सहभाग असा नवीन विचार विकास योजनास देण्यात आला लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरू केली , लाखो रुपयांचा पुरस्कार सुद्धा देण्यात आला ,  

 हा कार्यक्रम आता कायमस्वरूपी राबविण्यात येत असून मात्र गावात व गावालगत नाली , गटारात आणि बोरवेल लगत घाणीचे साम्राज्य  , काही ठिकाणी धार्मिक स्थळी अस्वच्छतेतून  विटंबना केली जात आहे , खंडविकास अधिकाऱ्यांचा तक्रारींकडे दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्हा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून , निलंबनाची कारवाई करण्याची शेकडो सुजाण नागरिकांनी माहिती देतांना मागणी केली जात आहे .

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी,अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने 2000 - 2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही लोकसहभागातून करण्यात आली असे दाखविण्यात आले आहे , 

शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी , घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी,वैयक्तिक स्वच्छता ,परिसर स्वच्छता , सांडपाण्याचे नियोजन आणि घन कचऱ्याचे व्यवस्थापन ,  मानवी मलमूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला असे म्हटले जात आहे ,

गावातील विद्यार्थी असो की गावातील पुढारी या सर्वांनी रस्त्यावरून आणि सार्वजनिक बाजारवाडीत हातात झाडू घेऊन झाडू मारून या योजनेत भरीव योगदान देत स्वखुशीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या ह्या सर्व लोकांनी स्वच्छतेची गावागावात ग्राम - धून निर्माण केली आणि आरोग्य संपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले जाते, सन २००८- २००९ पासून राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद मतदान संघ स्तरावरील मिळालेल्या गुणांवर ग्रामपंचायतीची खालीलप्रमाणे प्रतिवारी ठरविण्यात येते.

 (अ) ६० टक्के व त्याहून अधिक गुण  , (ब) ५०टक्के ते ५९ टक्के,(क) ४९% व त्यापेक्षा कमी गुण , उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना व द्यावयाच्या बक्षिसाचे स्वरूप  बक्षीस क्रमांक पंचायत समिती स्तर , जिल्हा परिषद स्तर  , विभागीय स्तर , राज्य स्तर  , प्रथम बक्षीस.२५ हजार ते ५ लाख आणि १० लाख ते २५ लाख , द्वितीय बक्षीस १५ हजार ते  3 लाख आणि ८ लाख ते 20 लाख , तृतीय बक्षीस  १०  हजार ते २ लाख,आणि ६ लाख ते १५  लाख , तसेच संपूर्ण राज्यात केंद्र शासनाकडून पुरस्कार मिळालेल्या पंचायत समितीला संबंधित वर्षात राज्य शासनातर्फे ४ लाख रुपये व केंद्र पुरस्कृत निर्मल पुरस्कार योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पुरस्कार मिळाल्यानंतर

 संबंधित प्रत्येक जिल्हा परिषदेला संबंधित वर्षात राज्य शासनातर्फे 20 लाखाचा तसेच ज्या जिल्हा परिषदांमधील जास्तीत जास्त टक्के ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल त्या जिल्हा परिषदेला १० लाखांची बक्षिसे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने देण्यात येतात,मात्र सर्व स्तरावर भ्रष्टाचार फोफावल्या मुळे प्रामाणिक नियंत्रण अभावी पुरस्कारासाठी सेटिंग आणि टक्केवारी अमलात येऊन लाखो- करोडो रुपय शासकीय निधीचा अफरातफर करून विल्हेवाट लावण्यात राजकीय पाठबळावर पुढाकार घेतलेला आहे, 

आजही शहरी व ग्रामीण भागात लहान ग्रामपंचायत स्तरावर परिस्थिती बघता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मोहीम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा कुचकामी ठरत असून गावात व गावालगत नाली ,गटारात व बोरवेल लगत घाणीचे साम्राज्य आणि धार्मिक स्थळी अस्वच्छते मुळे विटंबना केली जात असल्याचे उदाहरण आहेत त्यासंबंधाने खंडविकास अधिकारी यांना तक्रार देऊन सुद्धा त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षित धोरण हे गुन्हेगारीस पात्र ठरत असून जिल्हा प्रशासकीय वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी लावून दोषी,कर्मचारी,अधिकारी यांना तात्काळ  निलंबित करण्याची माहिती देताना शेकडो सुजाण नागरिकांनी मागणी केली आहे.

 शासनाच्यावतीने विविध योजनेअंतर्गत करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही काही गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान मोहीम ही  फोटो काढून व प्रदर्शन करून दिखाव्यापुरते अमलात आणल्याचे आढळून येत आहे आज परिस्थिती बघता गावात व गावालगत नाली - गटारांमध्ये आणि बोरवेल लगत घाणीचे साम्राज्य आणि काही ठिकाणी तर धार्मिक स्थळी परिसरात अस्वच्छता निर्माण करून विटंबना केली जात आहे ह्याबाबत खंडविकास अधिकारी पं . स . लाखनी यांना तक्रार व स्मरण पत्र देऊन सुद्धा याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित धोरण अवलंबून कर्तव्यात कसूर करीत असल्याचे आढळून येत आहे यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मोहिम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा बट्ट्याबोळ होत आहे , स्वच्छता मोहिमेचे महत्व जाणून निधीची अफरातफर करणाऱ्यां कर्मचारी , अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी दंडात्मक कारवाई करून, निलंबित करणे काळाची गरज आहे.

  एन.व्ही.साखरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता पालांदूर 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत