Breaking News

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा  

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे,लातूर : निलंगा तालुक्यातील मौजे. नणंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करून युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भाग घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे मत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी  कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार, पांचाळ सर, बिराजदार सर इतर शिक्षक व शिक्षिका, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, शुभम डांगे, दीपक स्वामी, उद्धव जाधव, अजय कांबळे, विद्यासागर पाटील, जिनेश्वर इंडे, बालाजी नारायणपूरे, बिरु भोजने इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत