उमरगा सोसायटीच्या चेअरमनपदी रणजित पाटील यांची बिनविरोध निवड
उमरगा सोसायटीच्या चेअरमनपदी रणजित पाटील यांची बिनविरोध निवड
रणजित पाटील हे जिल्ह्रातील सर्वात युवा चेअरमन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,शिवाजी निरमाळे,लातूर : तालुक्यातील उमरगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. लोकनेते स्व. विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे 3 उमेदवार बिनविरोध निवडूण आले तर उर्वरीत 10 उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी झाले.
नुकत्याच पार पडलेल्या निवड प्रक्रियेत रणजित पाटील यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड झाली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी बी.बी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन व अन्य पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली.
त्यात उच्चशिक्षीत रणजित राजपाल पाटील यांची चेअरमनपदी तर व्हा. चेअरमनपदी आत्माराम सोपान पवार यांची निवड झाली असून संचालक म्हणून गोविंद केसरे, विलास खाडप, बजरंग गुरमे, चंद्रहंस पाटील, समाधान लांडगे, हरिपाल शिंदे, सतीश पांचाळ, दिगांबर आवले, वि·ानाथ कांबळे व महिला प्रतिनिधी लिंबाबाई खाडप, निशा पत्की उपस्थित होते.
यावेळी सोसायटीचे सचिव भिमराव शिंदे हे उपस्थित होते. पदाधिकारी निवडीनंतर नुतन पदाधिकायांचा पुष्पहार घालून व फेटे बांधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पॅनल प्रमुख माजी चेअरमन विशालराव पाटील, भाऊसाहेब लांडगे,राजकुमार पाटील,सुधाकर घाडगे, शिवाजी खाडप, बालाजी मेकले, सौदागर पवार,सौदागर वाघ, शशिकांत पत्की, सुधाकर लांडगे, शशिकांत शिंदे, रघुनाथ शिंदे यांच्यासह गावातील युवक, मान्यवर मंडळी व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत