Breaking News

अहमदनगर जिल्ह्याचा 12 वी चा तालुकानिहाय निकाल, जिल्ह्यात हा तालुका सर्वाधिक

 अहमदनगर जिल्ह्याचा 12 वी चा तालुकानिहाय निकाल, जिल्ह्यात हा तालुका सर्वाधिक


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,नवनाथ दिघे, अहमदनगर : राज्याचा बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. जिल्ह्याचा निकाल 94041 टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींनीच मुसंडी मारली आहे. पुणे विभागात नगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात शेवगाव तालुक्याचा 98.57 टक्के सर्वाधिक निकाल लागला आहे.

तालुकानिहाय निकाल

संगमनेर (94.03), शेवगाव ( 98.57), श्रीगोंदा (92.33), श्रीरामपूर ( 86.76), अकोले (93.87), जामखेड ( 97.51), कर्जत ( 95.67), कोपरगाव ( 89.03), नगर (96.92), नेवासा (95.51), पाटनेट (97.88), पाथर्डी (95.55 ), राहाता (93.83), राहुटी (90.24),

जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 98.79 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण हे 98.60 तर मुलींचे प्रमाण 99.04 टक्के आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 93.44 टक्के लागला असून यामध्ये मुलांचे प्रमाण 91.35 तर मुलींचे प्रमाण 95.83 टक्के आहे. कला शाखेचा निकाल 86.97 टक्के असून यामध्ये मुलांचे प्रमाण 83.99 तर मुलींचे प्रमाण 91.91 टक्के आहे.

जिल्ह्यातून विज्ञान शाखेमधील 35 हजार 600 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 35 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील 17 हजार 794 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 15 हजार 477 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी वाणिज्य शाखेमधील 8 हजार 496 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यातील 7 हजार 939 विद्यार्थी पास झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत