भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीत डावलल्याने मुंडे समर्थकांकडून जाहीर नाराजी
भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीत डावलल्याने मुंडे समर्थकांकडून जाहीर नाराजी,
परभणी जिल्ह्यात उमटले पडसाद
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, परभणी : भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर मुंडे समर्थकांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यात 'पंकजा ताई नाही तर भाजपा नाही,
कमळ चिन्ह हद्दपार करणार', अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. भाजपाकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने हा त्यांना फार मोठा धक्का मानला जात आहे. राज्यभरातील मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याचे तीव्र पडसाद सोशल मीडिया उमटत आहेत. मुंडे समर्थकांकडून भाजपा नेत्यांवर टीका केली जात आहे. गंगाखेड तालुक्यातील वंजारी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यात 'कमळ चिन्ह हद्दपार करणार' अशी पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात भाजपाची सर्वाधिक ताकद असलेल्या गंगाखेड तालुक्यामध्ये पक्षाला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत