Breaking News

सरकारी जागेवर अतिक्रमण करणे आले अंगलट

डोंगरगाव साक्षर चे सरपंच पदावरून अपात्रअप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांचा निर्णय

महा घडामोडी न्युज विशेष प्रतिनिधी,कालीदास खोब्रागडे,भंडारा : डोंगरगाव/साक्षर ग्रामपंचायतीचे सरपंच हिरकण्या दशरथ दोनोडे यांचे कुटुंबीयांचे सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) नुसार दोषी आढळून येत असल्याने त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६(२) अन्वये ग्रामपंचायत डोंगरगाव/साक्षर येथील सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी आदेश पारित केल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करणे आले अंगलट अशा गावात चर्चा होत आहेत. 

         ७ सदस्यीय डोंगरगाव/साक्षर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये पार पडली. सरपंच पद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित असल्याने हिरकण्या दशरथ दोनोडे यांची सरपंच तर राजरतन शिवणकर यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सरपंचाने मनमानी कारभार सुरू केला. तसेच सरपंच महिलेचे पती दशरथ दोनोडे व सासरे कृशन दोनोडे व अन्य सदस्यांनी मौजा डोंगरगाव/साक्षर येथील सरकारी गट क्रमांक ५०० आराजी ०.९१ हेक्टर आर पैकी ०.०१ आर मध्ये सरपंच, पती व सासरे यांनी अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले आहे. त्याचा ग्रामपंचायत रेकॉर्ड नुसार मालमत्ता(घर) क्रमांक १०१ व १०२ आहे. 

         १९८८-८९ मध्ये डोंगरगाव/साक्षर येथे गट क्रमांक ५०० वर बळीराम डुकरू बावणे यांनी अतिक्रमण करून आबादि प्लॉट १०/५८ आणि १०/५९ वर अतिक्रमण केले होते. त्यांचेकडून यांनी विकत घेऊन १०० रुपयाचे स्टॅम्प वर विक्री पत्र करून ग्रामपंचायत रेकॉर्ड ला फेरफार करून बळीराम बावणे यांचे नाव कमी करून त्यांचे जागेवर सरपंच महिलेचे पती दशरथ दोनोडे व सासरे कृशण दोनोडे यांचे नावाने करण्यात आले. सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधले असल्यामुळे अतिक्रमण पंजीत अनुक्रमांक २५ वर नोंद घेतली असल्याचे माहिती होताच सामाजिक कार्यकर्ते नाना महादेव कठाने आणि दीनदयाल पैका कठाने यांनी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे १९ एप्रिल २०२२ रोजी प्रकरण क्रमांक ३३/अ-६९/२०२०-२१ सादर करून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१)(जे-३) व कलम १६ अंतर्गत सरपंच व सदस्य  पदावरून अपात्र घोषित करावे. 

अशी विनंती केली. अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी सर्व साक्षी पुरावे तपासून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सरपंच हिरकण्या दशरथ दोनोडे व कुटुंबीयांचे सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्याचे १४ जून २०२२ रोजी आदेश पारीत केले. या बाबद गावात माहिती होताच "कही खुशी कही गम" चे वातावरण निर्माण झाले असले तरी सरकारी जागेवर अतिक्रमण करणे आले अंगलट अशा चर्चा होत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत