सचिव सरपंच याच्या दुर्लक्षतेमुळे सातारा तुकूम या गावातील हातपंप पडले बंद
सचिव सरपंच याच्या दुर्लक्षतेमुळे सातारा तुकूम या गावातील हातपंप पडले बंद
वार्डातील महिलांना पडली पाण्याची टंचाई पाणी आणावे लागत आहे .४० मिटर अंतरावरून.
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,गणेश परचाके,पोंभुर्णा : मौजा सातारा तूकुम येथील गेल्या अनेक दिवसापासून हात पंप बिघाड असल्याने महिलांना 40 मिटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
मारुती कोवे यांच्या घरा जवळील हात पंप गेल्या कित्येक महिन्यापासून वार्डातील महिलांना ग्रामपंचायत येथे वारंवार माहिती देत असून सचिव सरपंच हे दुर्लक्ष करीत आहे. पाणी हे कुटुंबाला व जनावराला अति आवश्यक असल्याने पाणी 40 मिटर अंतरावरून आणत असताना जनावरासाठी पाण्याचा तुटवडा घरी कमी पळत आहे.
येत्या पाच ते सहा दिवसात हात पंप सुरू करण्या यावे. असे हात पंप जवळील महिला गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडे मनोगत व्यक्त करत असून त्याच प्रमाणे ग्राम पंचायत सातारा भोसले सचिव सरपंच यांनी ताबडतोब सातारा तूकुम येतील हातपंप कडे लक्ष देऊन लवकरात लवकर चालू करण्या यावे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत