भाजपाच्या कार्यावर टीकाटिप्पणी करणे महाविकास आघाडीला पडले महागात - कासंगोट्टूवार
भाजपाच्या कार्यावर टीकाटिप्पणी करणे महाविकास आघाडीला पडले महागात - कासंगोट्टूवार
चंद्रपूर भाजपाने केला जल्लोष
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशहिताचे निर्णय घेत आहे.परंतु विरोधी नेहमी भाजपाच्या कार्यावर टीकाटिप्पणी करतात.हेच मविआला महागात पडले.पर्यायाने भाजपाला राज्यसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले,असे प्रतिपादन भाजपा महानगर महासचिव सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले.ते गिरनार चौक येथे लोकनेते माजी अर्थमंत्री, आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात भाजपाच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना शनिवारी 11 जूनला बोलत होते.
यावेळी भाजपा महानगर महासचिव ब्रिजभुषण पाझारे,भाजपा नेते मधुकर राऊत,संजय पटले, पप्पू बोपचे, सतिष तायडे चंद्रकला सोयाम, आकाश मस्के,अभिलेश रोहीदास ,नितीन कारिया, रवी लोनकर, सोनू यादव,प्रवीण उरकुडे,राकेश बोमनवार, धनराज कोवे, विक्की मेश्राम, देवाश बेले, राज जोशी,ऋषी व्यवहारे, राजेंद्र पोडेकर विनोद शेरकी,प्रभा गुडधे, शिला चव्हान, माया उईके,शितल आत्राम, बर्षा सेललकर,डॉभारती दुधानी,संदीप आवारी,दिनकर सोमलकर,नरेंद्र चिप्परवार,संदीप आगलावे,राजेंद्र खांडेकर,बाळू कोलनकर,रवी चहारे,सतीश तायडे,दशरथ सोनकुसरे,देवानंद वाढई,चांद सैयद,गणेश रामगुंडावार,प्रलय सरकार यांची उपस्थिती होती.
कासंगोट्टूवार म्हणाले,विजयी उमेदवारांच्या निवडणूक क्रमवारीनुसार भाजपाचे पियुष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, तर डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे.तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 मते वैध ठरली.अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना,ब्रिजभूषण पाझारे म्हणाले,भारतीय जनता पक्षाच्यावर अनेक आरोप करणारे राजकारणात नवीन माणसं स्वतःला हुशार समजून खालच्या स्तरावर टीकाटिप्पणी करत होते त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली. प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर द्वेष बुद्धीने टीका करून आपण वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वांना मतदारांनी आरसा दाखवला.याप्रसंगी कार्यकर्त्यांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू असा संकल्प केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत