Breaking News

तू भांडण सोडवणारा कोण ? मित्राचं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर खंजीरने वार

 तू भांडण सोडवणारा कोण ? मित्राचं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर खंजीरने वार

मित्राचे भांडण सोडवायला जाणं पडलं महागात


तिघांकडून मारहाण, पाठीत खंजीरने वार

१९ वर्षीय तरुण जखमी,मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, परभणी : मित्राचे सुरू असलेले भांडण सोडवायला जाणे एका १९ वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले आहे. तू भांडण सोडवणारा कोण, असे म्हणत आरोपीने खंजीरने वार करून जखमी केले आहे. या प्रकरणी तीन आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद आबेद सय्यद आसूद, असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.


परभणी शहरातील रस्ता प्लॉट येथील माऊली नगरमध्ये राहणाऱ्या शिवाजी किसन जाधव याला सामीने फोन करून गंगाखेड नाका येथे बोलावून घेतले. त्यामुळे शिवाजी जाधव यांच्या घरच्यांनी शेजारी रहात असलेल्या सय्यद आबेद सय्यद आसूद याला गंगाखेड नाथा येथे जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे तो गंगाखेड नाका येथे गेला असता शिवाजी जाधव याला समी आणि त्याच्या सोबत असलेल्या विकी, शफी आणि मशु हे मारहाण करत असल्याचे दिसले.


समी याने शिवाजीला गळा धरून खाली पाडून मारहाण करत असताना सय्यद आबेद सय्यद आसूद हा त्या ठिकाणी गेला आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समी याने 'तू भांडण सोडवणारा कोण', असे म्हणत सय्यद आबेद याच्या पाठीत खंजीरने वार केले. तसेच, शिवाजी जाधव यांच्या पाठीत खंजीर मारून त्यांनाही जखमी केले.


यावेळी समीच्या सोबत असलेल्या विकी, शफी आणि मशु यांनीही या दोघांना मारहाण केली. सय्यद आबेद सय्यद आसूद याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सय्यद आबेद सय्यद आसूद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समी, विकी, शफी आणि मशु याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत