Breaking News

गाडी मालकांना माहीती न देता गाडीची विक्री करुन केली फसवणुक

गडचांदुरचे दलाल सुभाष जाधव यांनी बल्लारपुरचे वसीम शेख सोबत मिळुन गाडी मालकांना माहीती न देता गाडीची विक्री करुन केली फसवणुक

मागील दहा महिन्यापासुन पोलीस स्टेशन गडचांदुर च्या चकरा मारुन ही घेतली नाही तक्रार युवा स्वाभिमान पक्षाच्या मदतीने करण्यात आली तक्रार

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर ; मागील १८ महिन्यापासुन माराई पाठन चे रहवासी सोनकांबळे आणी खडकी ( हिरापुर ) चे रहवासी बालाजी गडीमे, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपुर, या दोघांची फसवणुक गडचांदुर चे रहवासी सुभाष गेडाम, पिपरडा चे रहवासी शेख चाँदभाई, बल्लारपुर चे रहवासी वसीम चाँद शेख, सास्ती चे रहवासी आतिश बाबू मोतकु या सर्वांनी मिळुन दोघांच्या बोलेरो पिक अप गाडी यांना माहिती नसतांना फोनवर सौदा करुन गडचांदुर येथुन गाडी घेऊन गेले आणी गडीमे ला नोटरी ची झेराँक्स प्रत व १०,०००/- रु देऊन गाडी गायब केली. फायनंस चे हफ्ते सुद्धा भरले नाही.

 फायनंस वाले गरीब मजुरदांना हफ्ते भरायला त्रास देत आहेत. फसवणुक करणारा सुभाष जाधव उर्फ लाला गाडी चे कमीशन खाऊन सुस्त आहेत. वसीम चाँद शेख का चे म्हणने आहे की जेव्हा गाडी चा सौदा झाला त्यावेळेस बालाजी गडीमे आणी सोनकांबळे ला पाहिले नाही लाला नावाच्या दलालानी त्यांना वसीम चाँद शेख, आतिश बाबु मोतकु ला बोलवुन लाला नी सौदा केला आणी स्वतःहा पैसे खाल्ले आहे . जेव्हा गाडी विक्री बद्दल माहिती मिळाली तेव्हा, बालाजी गडीमे व सोनकांबळे यांनी पोलीस स्टेशन गडचांदुर ला तक्रार देण्यास गेले परंतु तक्रार नोंदविली नाही. 

       मागी दहा महिन्यापासुन गडचांदुर पोलीस स्टेशन च्या चकरा मारत आहेत पण कोणतेही पोलीस गरीबांचे म्हणने ऐकुन घेण्यास तयार नव्हते. ऐवढेच नाही तर गडचांदुर चे पोलीस हेड कांस्टेबल रामटेके यांनी गाड्या शोधुन देते व तक्रार नोंदविते असे सांगुन ४०००/- रुपये घेतले. गोरगरीबांना लुटण्यासाठी पोलीस प्रशासन आहे की मदत करण्याकरीता, गडीमे आणी सोनकांबळे हे दोघे युवा स्वाभिमान पक्षाकडे तसेच आदर्श मिडीया एसोसिएशन कडे मदत मागीतली.

 युवा स्वाभिमान पक्षाचे व आदर्श मिडीया एसोसिएशन चे पदाधिकारी प्रिया झांबरे, संगीता वनकर, रुपेश रागीट माहिती घेण्यास  गेले. तेव्हा गावातील लोकांकडुन सत्य घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर गडचांदुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आमले सर यांना भेटुन दिनांक ११ जुन २०२२ ला तक्रार नोंदविली आहे. ठाणेदार आमले साहेब कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण गरीबांची मदत पोलीस करतील की पुन्हा १० महिने चकरा मारायला लावतील??? 

 असा प्रश्न युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारींना पडला, तक्रारकर्ते फार गरीब आहेत. हैदराबाद ला जनावर ची हायवा घेऊन जानारा ड्रायव्हर आणी फसवणुक करुन दुसऱ्यांच्या गाड्या विकणारा दलाल ला पोलीस पकडतील. गाडी, गाडीचे कागदपत्रे सर्व मागीतले आणी गाडीचे पैसे खाल्ले असल्याचे गडीमे व सोनकांबळे यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत