पदाचा दुरुपयोग केल्याप्रकारणी बल्लारपूरचे तलाठी रोहितसिंह चव्हाण निलंबित
कित्येक वर्षापासून तलाठी चालवत होता गोरखधंदा,
पण तहसीलदारांना कानोकान खबर नाही हे कस शक्य आहे
उलट आवाज उचलनाऱ्यावर तहसीलदाराचा दबाव
बड्या लोकांचा हाथ असल्याची सूत्रांकडून माहिती
सर्वे नंबर ३१/९३ चा शेवटचा फेरफार क्रमांक ८०१६ चा आदेश क्रं १ तहसील कार्यालयातुन दोन वर्षातच गायब,
तहसिलदार संजय राईंचवार यांचे दुर्लक्ष
पदाचा दुरुपयोग केल्याप्रकारणी बल्लारपूरचे तलाठी रोहितसिंह चव्हाण निलंबित
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, बल्लारपूर : मागील अनेक वर्षापासून तलाठी रोहित सिंह चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केली. अशी तक्रार युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेत, प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणा दिसून आल्याने बल्लारपूरचे तलाठी रोहित सिंह चव्हाण यांच्यावर उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी (पाटील) यांनी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
तलाठी चव्हाण यांच्यावर झालेल्या या कारवाहीमुळे अनेक भुमाफियांचे बिंग फुटणार असल्याने या प्रकरणाशी सबंधितांचे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तलाठी रोहित सिंह चौहान 2012 मध्ये शासकिय सेवेत रुजू झाले. मात्र , 1990 चा नकाशा स्वतःच्या स्वाक्षरी ने कुळमेथे यांना दिला, सर्वे नंबर ३१/९३ या शेतजमिनीचे सातबाऱ्यात खोडतोड करुन भु माफियांच्या स्वाधीन करुन दिली .
सोबतच सातबारा खोडतोड प्रकरण, वाटप जमिनी खरेदी विक्री प्रकरण, आणि आदिवासी भूखंड खरेदी विक्री प्रकरणात तलाठी रोहित सिंह चव्हाण यांच्या मध्यस्थीने कोट्यावधीच्या किमतीच्या आदिवासींचे भूखंड भुमाफियांना खरेदी विक्री करून दिले. अशी तक्रार युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि प्रिया झांबरे यांनी राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, राजुरा, तहसीलदार बल्लारपूर आणि पोलिस स्टेशन बल्लारपूर यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी केली होती.
वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशावरून कारवाई करीत, उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी (पाटील) यांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे कामात निष्काळजीपणा केल्याचा फटका ठेवत बल्लारपूर सांझाचे तलाठी रोहित सिंह चव्हाण यांना 6 महिन्यासाठी निलंबित केले. चव्हाण यांचा तात्काळ पदभार काढून त्यांच्या ऐवजी तलाठी शंकर खरूले यांना देण्यात आला आहेत.
प्राथमिक तपासणीत शासकीय कामात निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले. त्यामूळे तलाठी रोहितसिंह चव्हाण यांना 6 महिन्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी यांनी निलंबित केले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.: संजय राईचवार, तहसीलदार, बल्लारपूर.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत