पत्रकार संघाचा माउंट अबू दौरा व्यापाऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी
वसूली पत्रकारांवर अंकुश ठेवण्याची व्यापाऱ्यांची भावना
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजुरा : राजुरा तालुक्यात अनेक पत्रकार संघ असून ग्रामीण भागात पत्रकार (वार्ताहर ) ह्यांना येत असलेल्या समस्या सोडवणे ,अडचणीच्या किंवा संकटाच्या वेळेस त्यांची मदत करणे ही खरंतर कुठल्याही पत्रकार संघाकडून अपेक्षा असते मात्र राजुरा येथील दोन पत्रकार संघांनी जणू काही मागील काही काळापासून वसुली करताच पत्रकार संघाची निर्मिती केली की काय असा संशय आता अनेक पत्रकारांच्या मनात निर्माण होत आहेत,
मध्यंतरी एका क्रिकेट सामन्याची प्रायोजिकता एका पत्रकार संघांनी घेतली ह्यासाठी नाममात्र काही हजाराचा खर्च अपेक्षित असताना तो खर्च पत्रकार संघाच्या सदस्यांनी करणे अपेक्षित होते,मात्र तसे न करता चक्क ह्या सामन्यांच्या पावती बुकावर पत्रकार संघांनी संपूर्ण तालुक्यात वसुली मोहीम राबवली व भरमसाठ पैसे जमा केला,आता ह्या दोन पत्रकार संघांनी माउंट अबू ची सहल आयोजित केली असून ह्या सहलीचा खर्च वसूल करता यावा ह्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करन त्यासाठी व्यापाऱ्यांकडून सक्तीने वसुली केली जात आहे.
कार्यक्रमाचा नाममात्र खर्च करून उर्वरित पैशात सहलीचा खर्च भागवण्याचा या मागे उद्देश आहे,यात रेती तस्कर, तंबाखु विक्रेते, सार्वजनिक धान्य योजनेचे वितरक ह्यांना ठराविक रक्कम ठरवून देण्यात आली आहे,हे व्यापारीही आपले अवैध व्यवसाय बिनबोभाट चालावे म्हनून मागेल ती रक्कम बिनबोभाट देत आहेत ,परंतु अशाप्रकारच्या वसुली मुले पत्रकारितेचा मूळ उद्देश हरवत असून ह्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेणारे हे तथाकथित पत्रकार त्यांच्या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवून सामान्य नागरिकांना खरच न्याय मिळवून देऊ शकतील काय,
तसेच पत्रकार संघाच्या ह्या वारंवार वसुली मोहिमेमुळे हे व्यावसायिक पण त्रस्त झाले असून त्यांची अवस्था "भीक नको, पण कुत्रा आवर" अशी झाली आहे, ह्या व्यापाऱ्यांनी सांगितले की वर्षभरात अनेकदा पत्रकार संघ कुठल्यानं कुठल्या कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांच्या कडून सक्तीने वसुली करून घेऊन जाते, मग ह्या पत्रकार संघातील मंडळींच्या आशीर्वादानेच तर हे अवैध धंदे सुरु नाहीत ना, असाही संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
आता तर चक्क ह्या पत्रकार संघाने विदेश दौरा आयोजित करण्याचा बेत आखला असून स्वाभाविकपणे त्यात काही लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ,आता हा खर्च कुणाकडून वसूल केला जातो ह्या भीतीने अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे ,काही पत्रकारांच्या ह्या वारंवार वसुली मोहिमेमुळे अन्य पत्रकार मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत व त्यांची अवस्था "खाया पिया कुछ नही,गिलास फोडा बारा आना" अशी झाली आहे, त्यामुळे पत्रकार संघाच्या ह्या अवैध वसुली मोहिमेला कुठे तरी पायबंद लागावा व चुकीच्या गोष्टीची प्रथा पडू नये व समाजात जे वाईट आहे त्याविरुद्ध पत्रकारांनी आपली लेखणी वापरून सामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत