Breaking News

चिकलठाणा येथील शेतकरी कुटूंबातील मुलाने काढला ठेच हा चित्रपट

 चिकलठाणा येथील शेतकरी कुटूंबातील मुलाने काढला ठेच हा चित्रपट    

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे सेलू : सेलू तालुक्यातील चिकलठाणा खु येथील शेतकरी कुटूंबातील गजानन टाके याने प्रत्येकाच्या आयुष्याचा संघर्षमय प्रवास हा ठेच खाऊनच होतो. काही वेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेज जीवनात प्रेमात खाल्लेली ठेच आता मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहे.येत्या15 जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे काही दिवसांत ट्रेलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटाच पाहिलं गाणं तुमच्या बुलेट वर बसवून फिरवा हे zee मीडियावर प्रदर्शित झाल आहे आणि विशेष म्हणजे हे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल दिसतेय जवळपास 1million व्ह्यूज आतापर्यंत या गाण्याला मिळाले आहेत नृत्यांगना माधुरी पवार यांच्या दिलखेचक अदा आणि कोरिओग्राफी करणारे गणेश पतंगे यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

बऱ्याच वर्षानंतर असे गाणे आणि नृत्य मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तयार झाल्याची भावना अनेक चित्रपट आणि संगीत प्रेमींनी कमेंट आणि मॅसेज द्वारे प्रगट केली आहे. ट्रॅक्टर,ऑटो,दुकान,लग्न ई.ठिकाणी ,"तुमच्या बुलेट वर बसवून फिरवा" हे गान ऐकायला मिळत आहे.

  अतिशय गरीब घरातून आलेल्या  खऱ्या आयुष्यातील संघर्ष करत गावातील नाटकापासून ते मराठी चित्रपसृष्टीतील हा  अविश्वसनीय प्रवास करणाऱ्या आपल्या मातीतील परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा या छोट्याश्या गावातील गजानन टाके यांनी या चित्रपटा मधे मुख्य अभिनेता म्हणून काम केलं प्रेमकहाणी सोबतच,विनोद, ॲक्टिंग,आणि सामाजिक विषयाला घातलेला हात हीच संकल्पना वाखाणण्याजोगी  आहे .

श्री नृसिंह फिल्म प्रोडक्शन निर्मित ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, श्रीराम वांढेकर, कैलास थिटे, सय्यद मोईन,या मराठी मातीतील निर्माते आणि कलाकारांनी मिळून हे शिवधनुष्य पेलण्याच काम या नवयुवकांनी केलं आहे,या चित्रपटाच कथालेखन दिग्दर्शन लक्ष्मण थिटे यांनी केलं आहे तर इमरान आणी फैसल महाडिक यांनी संकलन केलं आहे. 

तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील सर्व गाणी यशराज स्टुडिओ मुंबई येथे रेकॉर्ड आणि मिक्सिंग झाली असून अव्वल पट्टीतील गायक ऋषिकेश रानडे आणि वैशाली म्हाडे यांनी ठेच चित्रपटातील गाणी गायली आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर अडथळ्याची शर्यत पार करून चित्रपट येत्या 15जुलै 2022 रोजी पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.सर्व  प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती पूर्ण टीमच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत