रावेर येथील शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य, प्रभारी राजमुळे आरोग्य निरीक्षक बेपत्ता
रावेर येथील शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य, प्रभारी राजमुळे आरोग्य निरीक्षक बेपत्ता
लोकप्रतिनिधी,तालुका स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत,तालुक्याला वाली कोणीच नाही का ?
प्रशासकाने लक्ष वेधण्याची गरज,
एक दोन शौचालय स्वच्छ करून संपूर्ण रावेर शहरात स्वच्छता मोहीम सुरू असल्याचे नगर पालिकाचा ढोंग
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दिपक तायडे,जळगाव : रावेर येथील न पा च्या सार्वजनिक शौचालयांची अगदी बिकट अवस्था असून संबंधित ठेकेदार साफ सफाई न करता पैसे उकलण्यात व्यस्त आहे. वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्या तक्रारींवर नगरपालिका रावेर लक्ष देताना कोणत्याही परिस्थितीत दिसत नाही म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा एक भयानक प्रकार आहे.
रावेर शहरातील जवळपास 99%शौचालय हे वाईट परिस्थितीत आहेत ,काही शौचालयांना दरवाजे नाहीत आणि विशेष म्हणजे लेडीज व पुरुष शौचालय काही ठिकाणी एकत्र म्हणजे शेजारी शेजारी आहेत त्यामुळे खूप लज्जास्फद हा प्रकार आहे ज्या मुळे कोणालाही मनस्ताप झाल्या शिवाय राहणार नाही ,कोणत्याही सीरियातील शौचालयाची पाहणी केली असता घाण व मैला आणि पाण्याने शौचालय तुडुंब भरलेले दिसते .
गावातील दोन तीन शौचालय फक्त नावापुरते स्वच्छ केले जाते नंतर मात्र तेही बिकट अवस्थेत असतात,धातूर मातूर काम पाहिले जात असते, इतर ठिकाणची अवस्था सुद्धा चांगली नाही आणि या भागातील समाज वर्कर अश्या मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत राजकारणी तर फक्त मतदान मागायला येतात लोकांच्या समस्या वर बोलायला त्यांना वेळ नाही याच कारणाने ठाकूर नामक ठेकेदार कोणालाही जुमानत नाही मुख्याधिकारी यांच्या आशीर्वादाने ठेकेदार काम करतोय की काय अशी शंका आहे, कारण नगर पालिका प्रशासन जर कठोर अंमलबजावणी करेल तर शप्पथ आहे.
दिनांक 14 जून पासून सदर लोकशाहीचा 4 था आणि महत्वाचा आधार मीडिया चा वापर केल्याने ठेकेदाराचे व नगरपालिकेचे धाबे दणाणले आहेत आता नगर पालिका रावेर खडबडून जागे झाले आहे परंतु फक्त एक दोन शौचालय स्वच्छ करून संपूर्ण रावेर शहरात स्वच्छता मोहीम सुरू असल्याचे भासवले जात आहे.
रावेर शहरात दररोज शौचालयाची साफसफाई का होत नाही हा प्रश्न आहे तरी उशिरा का होईना यंत्रणा भानावर येईल असे रावेर वासीयात बोलले जात आहे.संबंधित ठेकेदार जर व्यवस्थित काम करीत नसेल तर त्याचा ठेका रद्द करून त्याला त्याचे बिल पेयमेंट अदा करण्यात येऊ नये अशी नागरिकांची रास्त मागणी आहे, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक रावेर न पा करेल का, का ठेकेदाराचा मनमानी कारभार कायम करुन याच ठेकेदाराकडे शौचालय चा ठेका राहील या ज्वलंत विषयाकडे रावेर वाशीयांचे लक्ष लागले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत