Breaking News

शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या आकाशाकडे

 

शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या आकाशाकडे

तप्त उन्हामुळे शेती कामाचा खोळंबा तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभुर्णा : बहुल आदिवासी ओळख असलेला पोंभुर्णा तालुका मुख्य व्यवसाय शेतीचा आहे. शेतीवरच शेतकरी अवलंबून असल्याने पेरणीकरिता पावसाची सुरुवात होणार नक्षत्र म्हणून ओळखला जाणार मृग नक्षत्राचा दरवर्षी पेरणी केली जाते. परंतु या वर्षी आठ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही योग्य पेरणी पाऊस पडत नाही.

 तसेच पावसाच्या आगमनाची कोणताही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागले आहे. अजूनही जानवत असलेला उन्हाचा तीव्र उष्णा झडामुळे शेतकऱ्यांनी या शेतीचा कामाचा खोळंबा होऊन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे वर्षभराच्या रोजीरोटीसाठी शेतात पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आणि उन्हाच्या उखाड यापासून दिलासा मिळण्यासाठी सर्वांच्या नजरा पावसाच्या आगमनासाठी आकाशाकडे लागल्या आहे. अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चांगले प्रमाणे असून असे असले तरी अद्याप शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने शेतकऱ्यांनी तडजोड करून सावकारी कर्ज काढून पेरणी साठी विविध प्रकारे बी बियाणे खरेदी करून एकत्रित ठेवले आहे.

 वेळीच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागडी बियाणे खरेदी केले आहे. त्याचे कर्जाचे डोंगर उभे तर नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही उर्वरित काम शेतकरी करीत आहे. परंतु उन्हाचा प्रचंड झड लागत असल्याने शेती कामासाठी हे उष्ण तापमान अडथळा निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत