Breaking News

सेलू तालुक्यात विजाचे तांडव ; एका महिलेचा मृत्यू तर चार बैल दगावले

 

सेलू तालुक्यात विजाचे तांडव ; एका महिलेचा मृत्यू तर चार बैल दगावले

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी सूरज शहाणे,सेलू : सेलू तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.विजेच्या कडकडासह आलेल्या पावसात सेलू, खातगाव भांबट रवळगांव येथे वीज पडून दोन बैल ठार तर राव्हा येथे माहिलेचा मृत्यू झाला.

शहरासह तालुक्यात शुक्रवार 10जून रोजी दुपारी 2:45वाजता वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व ढगाचा गडगडाट सुरु होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली.खादगांव (भा )येथील परमेश्वर विनायक भांबट यांच्या शेतातील बैलाचा अंगावर वीज पडल्याने बैल दगावला.रवळगाव येथील शेतकरी रमेश निवृत्ती रोडगे यांच्या शेतात बैलाच्या अंगावर वीज बैल दगावला. डिग्रस खु येथे वीज कोसळून दत्तात्रय नानाभाऊ शेरे यांची गाय
दगावली.शहरातील राजेश झोल यांचा बैल वीज पडून दगावला.त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

तसेच तालुक्यातील राव्हा येथील बिस्मिला नांदेखान पठाण वय (45)हि महिला आपल्या शेतातील काडीकचरा वेचीत असताना दुपारी 3:30च्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

बिस्मिला नांदेखान पठाण यांच्या अंगावर वीज पडताच शेजारील शेतातील काम करणारे लोक आवाज एकूण धावत आले.जवळ येऊन पाहता बिस्मिला नांदेखान पठाण यांचे अंग भाजले होते.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.बिस्मिल नांदेखान पठाण यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत