Breaking News

गडबोरी येथील हातपंप पळविल्याने पाण्याची भीषण समस्या..

ग्रापंचायतींने जाणीवपूर्वक हातपंप पळविला.

ग्राम पंचायत पदाधिकाऱ्याचा पराक्रम,

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सिंदेवाही : कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना सुरू असल्याने गावागावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असताना गडबोरी येथील ग्राम पंचायत ने वार्ड क्रमांक 3 मधील हातपंप पळवून अन्य ठिकाणी नेल्याने नागरिकांनी ग्राम प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला असून याबाबतची वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली असल्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष जितेंद्र रामटेके यांनी कळविले आहे.

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत गडबोरी ग्राम पंचायत मार्फत सन २०२१- २२ या वर्षात पाणी टंचाई निवारण कार्यक्रमंतर्गत विंधन विहीर खोदून हातपंप बसविणे, या योजनेमध्ये वॉर्ड क्रमांक 3 मधील पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन अजय रामटेके यांचे घराजवळ हातपंप बसविन्याकरिता ग्राम पंचायत मी मासिक सभेत ठराव करून मंजूर करण्यात आला. तसा प्रस्ताव तयार करून स्थळ दर्शक नकाशा बनवून पंचायत समितीला पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात जेव्हा काम करण्यात आले. 

तेव्हा ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक सदर ठिकाणचे स्थळ बदलून वार्ड क्रमांक 2 मधील युवराज आंबेकर यांचे घराजवळ गरज नसताना हातपंप बसविण्यात आले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी काम केल्याचा फलक लावण्यात आला. त्यामध्ये अजय रामटेके यांचे घराजवळ हातपंप बसविले . असे लीहण्यात आले असल्याने गावातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अजय रामटेके यांचे घराजवळ हातपंपाची अत्यंत आवश्यकता असताना ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी येथील हातपंप का पळविला ?? हे न समजणारे कोडे आहे. 

अजय रामटेके यांचे घराजवळील स्थळ दर्शक नकाशा तयार करून इतरत्र हातपंप पळविला असल्याने याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असून अजय रामटेके यांचे घराजवळ त्वरित प्रस्तावित असलेला हातपंप बसविण्यात यावा, अशी मागणी बौद्ध समाज अध्यक्ष जितेंद्र रामटेके, आणि वॉर्डातील अन्य महिला ,पुरुषांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत