Breaking News

ट्रॅफिक जाममध्ये बस थांबली, कंडक्टरने खाली उतरून घाटात उडी घेऊन केली आत्महत्या

 

ट्रॅफिक जाममध्ये बस थांबली, कंडक्टरने खाली उतरून घाटात उडी घेऊन केली आत्महत्या

कंडक्टरने आत्महत्या का केली कारण मात्र अद्याप अस्पष्ट

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,नवनाथ दिघे, अकोले: अकोले तालुक्यातून हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. अकोले एस. टी. डेपोचे वाहक गणपत मारुती इदे (वय 44 रा. भंडारदरा) यांनी माळशेज घाटात उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि अकोलेच्या एस. टी. डेपोत वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत असलेले गणपत मारुती इदे हे काल अकोले कल्याण बस घेऊन गेले होते कल्याणला मुक्कामी असताना ते रात्री घरी येऊन परत ड्युटी ला जात असताना त्यांनी माळशेज घाट येथे रस्त्याचे काम चालु असल्याने ट्राफिक जाम असल्याने गाडी थांबली असताना गाडीतून उतरून दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळालेले नाही. मात्र ड्यूटीवर ताण तणाव होता का? कि घरगुती तणावात होता यावर चर्चा सुरू आहे.

कोविड संकटकाळ व नंतर संपाचा कालावधी संपुन नुकतेच महामंडळ व कर्मचारी कामावर रुजू झालेले होते अश्या काळातच वाहकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे . संप काळात वाहक- चालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती. नुकतीच संपकाळानंतर एस. टी. महामंडळ व कर्मचारी रुळावर येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत