Breaking News

कामे करण्याऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी जनता - आमदार लंके.

पाडळी येथील नवनिर्वाचित संचालकांचा आ.लंकेच्यां हस्ते सत्कार

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : पाडळी रांजणगाव येथे सरपंच विक्रमसिहं कळमकर  यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलची पूर्ण सत्ता आली त्यामुळे  विकासकामे करणाऱ्या नेतृत्वाला लोक संधी देतात असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी पाडळी रांजणगाव विकास सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

 पाडळी येथील सेवा संस्थेत  सरपंच विक्रमसिहं कळमकर व पाडळी रांजणगावचे उपसरपंच डी बी आण्णा करंजुले यांच्या सत्ताधारी ग्रामविकास मंडळाने मागील ५ वर्षात सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळेच मोठ्या मताधिक्याने १२ उमेदवार विजयी झाले आहेत.त्यामुळे आमदार लंके यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करत सर्वाचा सत्कार केला.

या प्रसंगी सरपंच विक्रमसिहं कळमकर व पाडळी रांजणगावचे उपसरपंच डी बी आण्णा करंजुले विठ्ठलराव साठे, खंडू खेसे,अमृता साठे, किरणराव साठे,अरुण उबाळे,सदाशिव साठे ,शहाजी कळमकर,जालिंदर कळमकर व नवनिर्वाचित सोसायटी संचालक आप्पासाहेब कळमकर,एकनाथ साठे,आप्पासाहेब साठे ,सुदाम साठे,देवराम करंजुले,गणेश कळमकर, संभाजी करंजुले, गणेश करंजुले,कांतीलाल उबाळे,भगवान उघडे, वामन जाधव,नंदाबाई कळमकर उपस्थित होत्या.

 नवीन इमारतीसाठी १० लाख निधी देण्याची ग्वाही.

 आमदार निलेशजी लंके यांनी सेवा सोसायटीच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० लक्ष निधी देण्याचे जाहीर केले तसेच साठे मळा येथे नवीन रस्ता कामासाठी १० लक्ष निधी मंजूर असून यासाठी अधिकचा निधी आवश्यक असल्याची मागणी सरपंच कळमकर यांनी केली असता निधी देण्याचे आमदार लंके यांनी मान्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत