पाण्याची भीषण टंचाई असलेल्या वॉर्डात २ बोरिंगचे भुमिपूजन
पाण्याची भीषण टंचाई असलेल्या वॉर्डात २ बोरिंगचे भुमिपूजन
महा घडामोडी न्युज नेटवर्क, दुर्गापूर : उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने अनेक ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याने भीषण पाणटंचाई निर्माण झालेली आहे. याचप्रमाणे दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये सुध्दा भीषण पाणी समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने या पाणी समस्येचे काही प्रमाणात निराकरण व्हावे या हेतूने २ हातपंप बसविण्यात आले.
या हात पंपाच्या खोदकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंचा मा. पुजाताई मानकर, मा. सुनील भाऊ काळे, माजी सरपंच मा. अमोल भाऊ ठाकरे, माजी उपसरपंच असिफ पठाणजी, ग्रामपंचायत सदस्य मा. माधुरी ताई मांडाळे,
मा. चित्रलेखा ताई मोदेकर, मा. सुनील भाऊ बरियेकर, सामाजिक कार्यकर्ते मा.सचिनभाऊ मांडाळे, मा. विशालभाऊ नायर, मा.राहुल भाऊ भगत, भोजराज शर्मा, पवन भाऊ मानकर, शाहरुख शेखजी, सय्यद नुरजी, उस्माईल शेखजी, शेख रहीमजी, पाशा शेखजी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत