Breaking News

सरस्वती पूजनाने राजपूत शैक्षणिक संकुलामध्ये ऑलिम्पियाड स्कूलची सुरुवात

 सरस्वती पूजनाने राजपूत शैक्षणिक संकुलामध्ये ऑलिम्पियाड स्कूलची सुरुवात

महा घडामोडी न्युज नेटवर्क, सांगली : सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षांचे युग आहे. यामध्ये आपला पाल्य मागे पडू नये यासाठी प्रत्येक पालकांची तारेवरची कसरत चालू असते. जिथे जाल तिथे जीवघेणी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये सर्वगुणसंपन्न असणाराच विध्यार्थी टिकणार आहे. त्यासाठी साधारण विषयांमध्ये आपल्या पाल्याला न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे. असे मत राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंब प्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत यांनी व्यक्त केले आहे. 

पुढे त्यांनी सांगलीकरांसाठी ऑलिम्पियाड ही संकल्पना स्पष्ठ होण्यासाठी मोफत आठ दिवसाचे वर्कशॉप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे. हे वर्कशॉप १३ जून २०२२ पासून १८ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ०५.०० ते ०७.०० या वेळेत असेल अशी माहिती राजपूत यांनी दिली. 

शैक्षणिक क्षेत्रातील अनेक बदल व स्थितांतरे सांगत येत्या शैक्षणिक वर्षात राजपूत ऑलिम्पियाड स्कूलची सुरूवात करत असल्याची माहिती दिली.आठ दिवस मोफत शिका मग प्रवेश निश्चित करा असेही त्यांनी सांगितले आहे. हे स्कूल इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंत असेल. या ऑलिम्पियाड स्कूलमध्ये मुलांना मूळ शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांचे धडे दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मुलांना एक ध्येय देऊनच शिकवले जाणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील निपुण शिक्षक म्हणजेच राजस्थान( कोटा) व हैद्राबाद या भागातून शिक्षकांची टीम असणार आहे. 

हे शिक्षक मुलांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी मदत करतील. परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही.पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांच्या आवडी-निवडी, वागणे व विचार यांचा परिणाम मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी होऊ शकतो. 

यासाठी पालकांनी स्वतःमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. पालकांनी शाळेतील गुणांवर अवलंबून न राहता विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासणे गरजेचे झाले आहे. सध्या स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा व विद्यार्थी यांचा संबंध दृढ होत चालला आहे.

यासाठी पालकांची जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांना कालपर्यंत टाळणारेच ‘स्पर्धा परीक्षांशिवाय? पर्याय नाही’ असे म्हणताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा, पारितोषिके, बक्षिसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च पदाच्या नोकरीची निवड करण्यापर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते. 

१९८०-८१ पासून महाराष्ट्र शासनाने पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास भाग पाडलेले आहे. पालकांना या सर्वांचे बरडन व भीती वाटत आहे. ही भीती व बरडन कमी होण्यासाठी व मैत्रीपूर्ण वातावरणात मुलांना या सर्वांची माहिती मिळण्यासाठी ऑलिम्पियाड स्कूलची स्थापना करण्यात आली आहे तसेच मोफत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. 

 आशा काही स्पर्धा परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत, पाचवी व आठवी स्कॉलरशिप, गणित-संबोध, प्रावीण्य व प्रज्ञा, डॉ. होमी भाभा परीक्षा, सी. व्ही. रामन परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा तसेच इंजिनीअरिंग, वैद्यकीय, आयआयटी, मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्याच लागतात.

 यांचे मोफत मार्गदर्शन इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या मुलांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील पत्यावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० पर्यंत संपर्क साधावा असे आव्हान संस्थेचे संचालक कपिल राजपूत यांनी केले आहे.

  यावेळी राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंब प्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत, संचालक कपिल राजपूत, किमया राजपूत, व्यवस्थापक डी. जी. बरगे, शिक्षकांमध्ये कृष्ण किशोर, स्वामी प्रसाद, सुप्रिया वारे, आर. योगेश, पल्लवी पद्माळकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत