तालुका विधी सेवा समिती,रावेर मार्फत बाल कामगार व मोटार वाहन कायदा शिबीर
तालुका विधी सेवा समिती,रावेर मार्फत बाल कामगार व मोटार वाहन कायदा शिबीर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,जळगांव : शासकीय विश्राम गृह सावदा येथे परिसरात तालुका विधी सेवा समिती,रावेर मार्फत बाल कामगार व मोटार वाहन कायदा या विषयांवर कायदेविषयक शिबीर तसेच मोबाइल व्हॅन फिरते लोक-अदालतीचे आयोजन करण्यात आले. सादर लोकदलातीत १३८ ची २ केसेस मोटार वाहन कायद्या अंतर्गत एकूण १८ केसेस तसेच कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत ३ केसेस चा निपटारा करण्यात आला.
त्यातून एकूण १००००/- रुपयांचा दंडाची वसुली करण्यात आली. शिबिराचे अध्यक्ष मा.न्या. श्री.प्रवीण पी. यादव साहेब होते. तसेच शिबिराला रावेर तालुक्याचे गट विकास अधिकारी मा. सौ. दिपाली कोतवाल उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन Adv.श्री.शीतलकुमार जोशी, अनुमोदन Adv.श्री.प्रमोद विचवे, कार्यक्रमाची रूपरेषा Adv.श्री.एस. बी. सांगळे, मोटार वाहन कायद्यावर Adv.श्री.प्रमोद विचवे यांनी मार्गदर्शन केले तसेच बालकामगार या विषयावर Adv.श्री.धनराज ई. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
फिरते लोक-अदालतीचे पंच न्यायाधीश म्हणून मा.न्या. श्री.प्रवीण पी. यादव तसेच पंच सदस्य म्हणून Adv.श्री.मेघनाथ चौधरी हे होते.
सादर शिबीर व लोकअदालतीसाठी सावदा पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी श्री. डी. डी. इंगोले तसेच श्री. समाधान गायकवाड रावेर वकील संघाचे अध्यक्ष Adv.श्री.एस. बी. सांगळे, सचिव Adv.श्री.प्रमोद विचवे, उपाध्यक्ष Adv.श्री.शीतलकुमार जोशी, Adv.श्री.धनराज ई. पाटील,Adv.श्री.राकेश पाटील, Adv.श्री.संदीप मेढे,Adv.श्री.एस. एम. सोनार,Adv.श्री.तुषार पी. चौधरी, PLV सौ.सुनीता दरेकर,
सौ.वर्षा पाटील, श्री. दयाराम नामदेव मानकरे, श्री. बाळकृष्ण पाटील, श्री.राजेंद्र अटकाळे, न्यायालयीन कर्मचारी सहा.अधि.श्री.सुगंधिवाले,स्टेनो श्री. मनोहर शिंपी, व.लिपिक श्री.डी. जी. इंगळे, श्री. बी. के. तडवी, श्री. राहुल सोनावणे, श्री.भरत बारी, श्री.दिनेश साळी, श्री.भगवान पाटील, श्री.सतिष रावते, किशोर तुळशीराम पाटील इ. चा सहभाग आणि सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत