Breaking News

झरी जामनी तालुक्यातील अडेगाव,खातेरा,मार्कि,भेडाळा,कोसारा,पांढरकवडा विध्यार्थी बस फेऱ्या त्वरित सुरू करा

 झरी जामनी तालुक्यातील अडेगाव,खातेरा,मार्कि,भेडाळा,कोसारा,पांढरकवडा विध्यार्थी बस फेऱ्या त्वरित सुरू करा

मंगेश पाचभाई यांनी दिले वणी आगरला निवेदन

 सोमवार पासून बस विध्यार्थी बस बस फेऱ्या सुरू होईल -साळवे आगर प्रमुख (वणी)

महा घडामोडी न्युज नेटवर्क,यवतमाळ : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शाळा सुरू झाल्या आहे यातच झरी जामीन मधील शाळा सुरू झाल्या आहे यातच विध्यार्थी शाळेत जायला बस फेऱ्या उपलब्ध नसल्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे हाच मुद्दा घेऊन युवा नेते मंगेश पाचभाई यांनी अडेगाव,खातेरा,येडत,पांढरकवडा,मार्कि,मागली, भेडाळा,कोसारा अनेक तालुक्यातील विद्यार्थी याना ये जा करणाऱ्या बस फेऱ्या सुरू करण्या करीता निवेदन दिले तालुक्यातील विद्यार्थ्यांना मानव विकास बस सेवा सुरू करा ,व इतर फेऱ्या सुरू करा करिता आगर प्रमुखास निवेदनाद्यारे मागणी केली परिसरातील रस्ते खराब असल्यामुळे ऑटो व इतर धोका दायक वहिनींनी प्रवास करावा लागत आहे.

या साठी युवा नेते मंगेश पाचभाई यांनी वणी आगर गाठून निवेदन दिले व तालुक्यातील मानव विकास सोबतच विध्यार्थी फेऱ्या त्वरित सुरू करण्यांची मागणी केली या वेळी सरपंच सीमा लालसरे राहुल ठाकूर व विध्यार्थी उपस्तीती होते,सोमवार पासून बस फेऱ्या सुरू करण्याची ग्वाही यावेळी आगर प्रमुख यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत