Breaking News

वीज कोसळून बैल जोडी ठार

 वीज कोसळून बैल जोडी ठार


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे गावालगत शेतशिवारात सुरेश हरीजी साठवणे यांची बैल जोडी झाडा खाली बांधली असताना अचानकपणे विज कोसळून बैल जोडी जागीच ठार झाली.

 ही घटना दुपारी 3.30 च्या सुमारास घडली असून त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी शेतक-यांनी मागणी केली आहे . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत