Breaking News

रेती एवजी बद्री चा वापर, सावली येथील सी,सी,रोड चे बांधकाम निकृष्ट्य दर्जाचे

 रेती एवजी बद्री चा वापर, सावली येथील सी,सी,रोड चे बांधकाम निकृष्ट्य दर्जाचे


महा घडामोडी न्युज नेटवर्क,सावली : सावली येथील नगर पंचायत प्रभाग क्र 17 येथील रोड चे बांधकाम निकृष्ट्य दर्जाचे होत असून 2 दिवसात बेड ला भेगा गेल्या असून बद्री रेतीचा मोठा प्रमाणात वापर होत आहे,रोड ,व बेडवर पाणी सुद्धा मारण्यात येत नाही,नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप असून नियमाप्रमाणे सोलिंग न करता बेड टाकण्यात आला असून तो बेड नियमानुसार नसून मोठ्या प्रमाणात कामात गैरव्यवहार होत असून नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

सविस्तर माहिती अशी आहे की, सावली तालुक्यातील प्रभाग क्र 17 चंदू देऊरघरे ते प्रमोद नागरे यांच्या घराकडे जाणारा सी.सी. रोड बांधकाम निकृष्ट्य दर्जाचे होत आहे, रोडची सोलिंग न करता ,रेती ऐवजी बद्री रेतीचा वापर होत असून रोड व बेडवर पाणीही मारत नसून आत्ताच बेड ची गिट्टी उखडली आहे रस्त्याचे काम मागील चार दिवसांत सुरू आहे.

 रस्ता पूर्णतः धुळीने माखलेला आहे. रस्त्यावरीलवरील धूळ स्वच्छ न करता अथवा रस्त्याची लेव्हल न करता हा रस्ता सिमेंट करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल येथील ग्रामस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे. हा रस्ता व्हावा म्हणून अनेक वेळा येथील ग्रामस्थांनी नगर प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मोठ्या संघर्षानंतर सुरू झालेल्या या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर, ही झालेल्या कामाची नगराध्यक्ष यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. निकृष्ट होत असलेल्या रस्त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पक्क्या रस्त्याचे स्वप्न धुळीला मिळत आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का? सावली प्रभाग क्र 17हा पक्का रस्ता अत्यंत निकृष्ट होत आहे. याची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर, ठेकेदारांची पाठराखण लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोपदेखील ग्रामस्थ करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत