दहावी निकाल लागला तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
दहावी निकाल लागला तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
महा घडामोडी न्युज नेटवर्क, सांगली : दहावीचे निकाल लागले असले तरी अकरावीच्या प्रवेश (admission) प्रक्रिया लगेच सुरू होणार नाही. कारण अद्याप केंद्रीय बोर्डाचे म्हणजे CBSE आणि ICSEचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे अकवारी प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात झाल्या आहेत. त्यामुळे या मंडळाला प्रथम आणि द्वितिय सत्रातील परीक्षेचे गुण एकत्र करुन निकाल तयार करायचे आहेत. ICSEचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.निकाल जाहिर न झाल्यानं विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी (admission) नोंदणी सुरु झालेली नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळता येणार नसल्यामुळे उच्च माध्यमिक म्हणजेच अकरावी सुरु होण्यासाठी सप्टेंबर अखेर कालावधी लागण्याची शक्यता आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत