Breaking News

नेताजी सुभाष विद्यालयाचा 100% निकाल यावर्षी हि निकालात मुलींनीच मारली बाजी

 नेताजी सुभाष विद्यालयाचा 100% निकाल यावर्षी हि निकालात मुलींनीच मारली बाजी 


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे,सेलू : सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु येथील नेताजी सुभाष विद्यालयाचा इयत्ता 10वी चा निकाल 100%लागला आहे.प्रति वर्षाप्रमाणे निकालाची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2022मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी विद्यालयातून 41विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.41विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


या मध्ये 14विद्यार्थी विशेष प्रावीण्यात 13विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 14विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेआहेत.तर यामध्ये कुमारी महाजन साक्षी गजानन व 91.20%रासवे प्रीती मनोहर गुण 91.20% सर्वाधिक गुण घेऊन प्रथम क्रमांक रासवे अंकिता अण्णासाहेब 91% गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर कोरडे रोहिणी मारोती गुण 90.20% गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम व शिक्षक नाईक सर, चव्हाण सर, काकडे सर, लिपिक लिंगसेकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत