कोरठण खंडोबा येथे रंगदास स्वामी पायी दिंडीचे उत्साहात स्वागत
कोरठण खंडोबा येथे रंगदास स्वामी पायी दिंडीचे उत्साहात स्वागत
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे,पारनेर : पंढरपूर आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आणे(ता.जुन्नर) ते पंढरपूर आणि क्षेत्र शिंदेवाडी ते पंढरपूर या दोन पायी दिंड्यांचे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानवर आज आगमन झाले देवस्थान तर्फे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड,किसन मुंढे,बन्सी ढोमे,निवृत्ती वाळूंज,भाऊसाहेब पुंडे,विकास घुले, समाधान पुंडे,विक्रम ढोमे यांनी पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
हालकाशा झालेल्या पावसाने मंदिर परिसर निसर्गरम्य झाला आहे. पायी दिंडीत आलेल्या महिला व पुरुष वारकऱ्यांमध्ये पायी दिंडीत चालण्याचा मोठा उत्साह व आनंद भरभरून वाटत होता. दोन वर्षांच्या विलंबानंतर सर्वांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली दिसत होती.
अहम् वाघा!सोहम वाघा!प्रेम नगरी वारी,मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी! या अभंगावर वारकरी दंग होऊन नाचत होते. महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीला चालल्या होत्या. त्यामध्ये वयोवृद्ध वारकर्यांचा सहभाग जास्त होता. देवस्थान तर्फे आणि निवृत्ती वाळुंज यांच्या वतीने दोन्ही दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला. देवस्थानतर्फे दिंडीप्रमुख व विणेकरी यांचा सन्मान अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड यांनी केले.
हरिनामाच्या गजरात कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेऊन दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.पंढरपूर आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आणे(ता.जुन्नर) ते पंढरपूर या रंगदास स्वामी पायी दिंडीचे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानवर आज आगमन झाले देवस्थान तर्फे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड यांनी स्वागत केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत