उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रुग्ण हक्क परिषद लोकांचे आयुष्य वाढवण्याचे काम करत आहे - ज. वि. पवार
उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रुग्ण हक्क परिषद लोकांचे आयुष्य वाढवण्याचे काम करत आहे - ज. वि. पवार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,अविनाश मुंढे, पुणे : इतर कुठल्याही संकटांपेक्षा माणसाला आलेले आजारपणाचे संकट अत्यंत भयंकर आणि वेदनादायी असते. हॉस्पिटलमध्ये आजारपणाच्या काळात लाखो रुपयांची येणारी बिले पाहून माणूस अर्धमेला होऊन जातो. उपचारांनी बरा होणारा माणूस, लाखो रुपयांचे बिल पाहून गर्भगळीत होतो. महागडी उपचार पद्धती आणि हॉस्पिटलची असुविधा लक्षात घेता रुग्णाच्या कुटुंबाचे खूप खच्चीकरण होते, मात्र अशा संकटाच्या काळात, माणसाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्याचे काम उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रुग्ण हक्क परिषद करत आहे, असे गौरवोद्गार दलित पॅंथरचे संस्थापक नेते ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी काढले.
दलित पॅंथरचे संस्थापक नेते, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या केंद्रीय कार्यालय आणि वैद्यकीय मदत केंद्रात भेट दिली. यावेळी त्यांचा रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, रमाई राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे प्रमुख उपस्थित होते.
ज. वि. पवार पुढे म्हणाले की, रुग्णांचे काही हक्क असतात, अधिकार असतात. सामान्य आणि गरीब माणसाला दर्जेदार उपचार मिळविण्याचा हक्क आणि अधिकार आहे. याची जाणीव रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेला करून दिली.
उमेश चव्हाण म्हणाले की, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध समतेचा पुरस्काराचा आग्रह करणारी दलित पॅंथरची चळवळ स्थापन करणाऱ्या ज.वि. पवार यांचे सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज. वि. पवार यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या कामाचा घेतलेला आढावा हा आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत