Breaking News

नेताजी सुभाष विद्यालयामध्ये सेवानिवृत्त लिपिकाचा सत्कार

 नेताजी सुभाष विद्यालयामध्ये सेवानिवृत्त लिपिकाचा सत्कार

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे सेलू : चिकलठाणा बु येथील नेताजी सुभाष विद्यालयामध्ये लिपिकाचा सन्मान सोहळा मार्गदर्शन आणी कर्मचाऱ्याच्या अनुभवपर कथनाने आज विद्या मंदिरी थोर आले पाहुणे या स्वागत गीताने शाळेत चांगलाच रंगला 

दिनांक 30जून रोजी नेताजी सुभाष विद्यालय चिकलठाणा बु येथील लिपक श्री लिंगसेकर एस पी सेवानिवृत्त शाळेत त्यांचा सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सरांचा शाळेच्या वतीने व गावातील ग्रामस्थांच्या वतीने सपतनिक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम साठी प्रमुख म्हणून श्री यू एस थोबाळ तर अध्यक्ष श्री के आर पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमची सुरुवात सरस्वती पुजानाने झाली विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी वंदना, खवणे पिंपरी येथील मुख्याध्यापक श्री जोशी के आर,श्री स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री भगवानराव जाधव तर श्री प्रीतम महाजन यांनी निवृत्त म्हणजे प्रवासाचा शेवट नाही तर निवृत्त म्हणजे नविन आयुष्य नवा आनंद काही! अशा भाषनाणे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात शाळेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमसाठी गावातील प्रतिष्टीत मंडळी लिंगसेकर सरांची मित्रमंडळी तसेच नातेवाईक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री नाईक सर, श्री चव्हाण सर, श्री काकडे सर,श्री कोंडीबा रासवे, श्री एलकेवाड यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत