अष्टभुजा वाॅर्डातील पाण्याची समस्या तातडीने सोडवा : सौ. उज्वला प्रमोद नलगे
अष्टभुजा वाॅर्डातील पाण्याची समस्या तातडीने सोडवा : सौ. उज्वला प्रमोद नलगे
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : अष्टभुजा वार्डात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असल्याने तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका उज्ज्वलाताई नलगे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील अष्टभुजा वॉर्ड व नमस्ते चौक येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. तेथील पंधरा ते वीस असे परिवार आहे, ज्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही आहे. वस्तीमधील सर्व नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहे. वस्तीतील नागरिकांनी या समस्येसाठी तत्कालीन नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, नगरसेवकाने या गंभीर समस्येकडे अक्षरशः दुर्लक्ष केले.
त्यामुळे येथील नागरिकांची गंभीर समस्या लक्षात घेता येथे महानगरपालिकेतर्फे पाण्याची टाकी बसवून देण्यात यावी किंवा सरकारी नळाची सोय करण्यात यावी. या पाण्याच्या समस्येकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाण्याची समस्या निकाली लावावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटिका उज्ज्वलाताई नलगे, विद्या ठाकरे, बबली पारोडी, रोहिणी चौबे, प्रतीभा तेलतुंबडे, पोर्णिमा पुण्य साहू आदींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत