Breaking News

कोल्हापुरी बांधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारे आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जाळ्यात

 कोल्हापुरी बांधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारे आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जाळ्यात

महा घडामोडी न्युज नेटवर्क,वर्धा : मौजा नांदपुर (धनोडी) जवळील कर्माबाद शिवारातील बाकडी नदीचे काठावर असलेल्या कोल्हापुरी बांधऱ्याच्या ४५ लोखंडी प्लेटा लघु सिंचन पाठबंधाऱ्याच्या टिनाचे शेडमध्ये कुलुप बंद करून ठेवल्या होत्या.. दि.२५-०६-२०२२ ते दि २८-०६-२०२२ चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने टिनाचे शेडचे लॉक तोडुन आतमध्ये ठेवुन असलेल्या बांधाऱ्याच्या ४५ लोखंडी प्लेटा किंमत २,७०,०००/- रू. च्या माल चोरून नेल्याने फिर्यादी (सरपंच) श्री पवनकुमार श्रीधरराव गवळी, रा. नांदपुर यांचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अप. क्र. ६०३/२०२२ कलम ४६१, ३८० भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मुखबीरकडुन माहीती मिळाली की, तळेगाव (शा.पं.), ता. आष्टी येथे राहणारा जसबिरसिंग बावरी हा मागील १ महिन्यापासून नांदपुर येथील बाकडी नदीचे काठाने वारंवार फिरतांना दिसला आहे. अश्या माहीतीवरून त्यास ताब्यात घेवुन कसून विचारपुस केली असता त्याने बांधऱ्याच्या ४५ लोखंडी प्लेटा त्याचे चुलत भावाचे मदतीने मोटारसायकलने चोरून नेल्या असून मित्राचे मदतीने मालवाहु गाडीने नागपुर येथे विकल्या बाबत सांगितले. 

आरोपी १) जसिबिरसिंग मुलकसिंग बावरी, रा. तळेगाव, २) जसविरसिंग जगीरासिंग बावरी, रा. पाचपावली, रा. नागपूर, ३) शैलेंद्रसिंग सुरजसिंग बावरी, रा. पाचपावली, नागपुर, ४) केवलसिंग समशेरसिंग पटवा, रा. पिंपळा पुनर्वसन, आर्वी, ५) शुभम शंकरराव लाडके, रा. नेताजी वार्ड, आर्वी यांना ताब्यात घेतले. भंगार दुकानदाराने सदर चोरीचा माल खरेदी करून जवळ असलेल्या गॅस कटर मशीने गलविल्याने आरोपी ६) भंगार दुकानदार रामआसरे रतनलाल शाहु, रा. कळमना नागपुर यास अटक करून.

 आरोपींजवळून १) अशोक लेलँड कंपनीची डोस्ट एल. एस. चारचाकी मालवाहु गाडी क्र. एमएच-४९ /एटी-८२६१ जुनी वापरती किंमत अंदाजे ५,००,०००/- रू. २) लोखंडी प्लेटा व लोखंडी अँगलचे तुकडे वजन २९६० किलोग्रम एकुण किंमत २,७०,०००/- रू. ३) भारत गॅस कंपनीचे जुने वापरते कमर्शियल सिलेंडर अंदाजे १५००/- रू. ४) एक ऑक्सीजन सिलेंडर किंमत अंदाजे १५,०००/- रू. ५) दोन पिवळया धातुचे गॅस रेगुलेटर जुनी वापरती किंमत सिंलेडर जुनी वापरती किंमत अंदाजे २०००/- रू. ६) एक गॅस कटर व दोन रबरी पाईप जुनी वापरती किंमत अंदाजे ३०००/- रू. ७) एक जुनी वापरती मोटारसायकल बजाज कंपनीची २२० पल्सर किंमत अंदाजे १,००,०००/- रू. असा एकुण ८,९१,५००/- रू. चा माल जप्त करून १२ तासाचे आत सदरचा गुन्हा उघडकिस आणला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी श्री सुनिल साळुंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री भानुदास पिदुरकर यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि हर्षल नगरकर व पोलीस अंमलदार रंजित जाधव, सुनिल मळणकर, अनिल वैद्य, सतिश नंदागवळी, किशोर साटोणे, प्रदिप दातारकर, अतुल गोटेफोडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत