Breaking News

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाच्या टोकाच्या दोन्ही बाजू कमकुव

 चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाच्या टोकाच्या दोन्ही बाजू कमकुवत

  सततधार पाऊस ठरला धोकादायक व नुकसानकारक

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : वरोरा तालुक्यातील सोईट हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून याठिकाणी याठिकाणी वर्धा नदी असून नदीला चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहे.व्यापार व जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी नदीवर पुलाची निर्मिती झाली तर वरोरा ते यवतमाळ अंतर हे 40 किलोमीटर नी कमी होईल.त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री संजय देवतळे व तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी मंत्रिमंडळासमोर पूल बांधणीचा प्रस्ताव ठेऊन तो मंजूर करवून घेतला. आणि पुलाचे बांधकाम झाले.

परंतु अपुऱ्या निधीमुळे पुलाची उंची कमी झाली असावी आणि पावसाळ्यात पाण्याची पातळी दोन्ही तिरापर्यंत पोहचली की पूल पूर्णतः डुबतात आणि रहदारी बंद होतात.या आलेल्या महापुराने पुलाच्या दोन्ही टोकावरच्या साइड खरवडून नेल्याने वाहनचालकां समोर आपले वाहन पुलावरून सुरक्षित जाईल की नाही अशी समस्या व भीती निर्माण झाली आहे.दोन्ही जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पुलालगत रस्त्यांची व पुलाची डागडुजी करावी अशी मागणी दोन्ही जिल्ह्याच्या जनतेनी केली आहे.

      वर्धा नदीचा पूल हा चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्यासाठी एक वरदान ठरले आहे.वरोरा तालुक्यातील नागरिकांसाठी वणी ,जोडमोह ,करंजी या मार्गाने जास्त अंतरावरून प्रवास करावा लागत होता.परंतु सोईट नदीवरून पूल झाल्याने हेच अंतर 40 किलोमीटरनी कमी झाल्याने,कळंब, यवतमाळ मार्ग सहज सोपी व सरळ झाला आहे.व्यापारी, शेतकरी, यांना आपले व्यवसाय करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आपला माल यवतमाळ जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यासाठी पूल हा जनतेसाठी नवसंजीवनी ठरला आहे.

नदीचे पात्र मोठे असून या नदीवर पूल झाला तर व्यापाराचे दृष्टीकोनातून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचा संबंध वाढेल .यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री संजय देवतळे,तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचा संयोग जुळून आला आणि वर्धा नदीवर पूल व्हावा यावर दोन्ही तत्कालीन मंत्र्यांची सहमती झाली.पुलाचा प्रस्ताव सुद्धा पास करवून घेतला. आणि नदीवर पुलाची उभारणी झाली मात्र पूल हा कमी उंचीचा झाला असल्याने नदीच्या दोन्ही तिरापर्यंत 

पाणी पोहचले की पूल डुबतात.या झालेल्या पुरामुळे पुलाच्या दोन्ही टोकाच्या पुलालगत जागा पाण्याने खरवडून नेल्याने पुलाला धोका तर झालाच परंतु रहदारी करणाऱ्या जनतेला भीती झाली असून अपघाताची श्यक्यता बळावली आहे. तरी दोन्ही जिल्ह्याच्या बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन खचलेल्या भागाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी दोन्ही जिल्ह्यातील जनतेनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत