Breaking News

अर्थिंगचे कॉपर चोरणारा आरोपीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्या मुसक्या

 अर्थिंगचे कॉपर चोरणारा आरोपीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्या मुसक्या

महा घडामोडी न्युज नेटवर्क,वर्धा : फिर्यादी श्री सचिन जगदीश नंदनवार, विदयुत अभियंता, नगर परिषद, हिंगणघाट, रा. न्यु सुभेदार ले-आउट, नागपुर यांनी दिनांक ११-०७-२०२२ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की, दि.२५-०६-२०२२ चे ११.०० वाजता ते दिनांक ११-०७-२०२२ चे १०.०० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने नगर परिषद, हिंगणघाट चे अंतर्गत येणारे पिली मस्जीदचे मागील बाजुस असलेल्या मलनिस्सारण केन्द्र येथे लागलेल्या ११ के.व्हि. क्युबीकल मशीनचे कॉपर अर्थिंग किंमत अंदाजे ७०,०००/- रूपयांचे कापुन चोरून नेले. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप.क्र. ८१५/२०२२ कलम ३७९ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीवरून आरोपी नामे अमोर उर्फ काका यादवराव वडे, वय ३५ वर्षे, रा. भिमनगर वार्ड, हिंगणघाट यास निष्पन्न करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला कॉपर अर्थिंग (तांबे) चा एकुण ७०,०००/- रूपयांचा माल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. के.एम. पुंडकर यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, आशिष गेडाम यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत