जिल्हा प्रशासन अलर्ट असताना करंजीतील प्रशासकीय यंत्रणा कोमात
जिल्हा प्रशासन अलर्ट असताना करंजीतील प्रशासकीय यंत्रणा कोमात
पूर,आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील गावचे कर्मचारी मोकाट
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सत्यशील पुणेकर,गोंडपिपरी : मागील चार दिवसापासून गोंडपिपरी तालुक्यात सततधार पाऊस सुरु आहे.अजूनही पाऊस थांबतांना दिसत नाही.अशावेळी धरणाचे पाणी देखील सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला.स्थानिक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना मिळाल्या.यातही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या करंजी गावात प्रशासकीय आदेशाला कर्मचाऱ्याकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.गावातील आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी या संकटकालीन परिस्थितीत गावात हजर नाही.महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याने देखील गावात अजूनपर्यंत साधे ढुंकूनही बघितले नाही.चारही दिशेनी पाण्याने वेढणाऱ्या या गावाविषयी प्रशासनाची अनास्थाच दिसत आहे.येथील सद्याच्या उपाययोजना पाहता सरकारी आदेश निव्वळ कागदावरच दिसून येत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव हा लोकसंखेंनी मोठा आणि अत्यंत दाटीवाटीत वसलेला गाव आहे.या गावाच्या सभोवताल चार तलाव असून मध्यभागात करंजी गाव वसला आहे.गावात असमजदार आणि अडाणी लोकांची संख्या अधिक असतांना आरोग्याच्या दृष्टीने हा गाव अत्यंत सवेदनशिल समजल्या जाते.प्रशासकीय दरबारी सुध्दा या गावची नोंद धोकादायक म्हणूनच आहे.करंजी गावाने आतापर्यंत अनेकदा पुराचा सामना केला आहे.अधिक पाऊस आला की गावात दरवर्षीच पुराचे पाणी घरात घुसते.
बऱ्याचदा येथील कुटुंबाला हलविण्याची वेळ प्रशासनावर आली.अशावेळी ही सर्व परिस्थिती जिल्हा,तालुका आणि स्थानिक प्रशासनाला माहिती असून देखील फुकट पगार खाणाऱ्या यंत्रणेतील काही लोकांना याचे कुठलेच सोयरसुतक नाही.पावसाळ्यातच नाही तर इतर दिवसातही गावातील आरोग्य यंत्रणा पूर्णवेळ ड्युटीवर राहत नाही.प्रशासनाच्या मुख्यालयी राहण्याचा आदेश हे महाशय रोजच खिशात घालून फिरताना दिसतात.
अनेकदा ड्युटी करंजी गावात असताना कर्मचारी दिवसभर गोंडपिपरीतच आढळून येतात.या गावासह आरोग्य विभागाच्या तालुक्यातील बऱ्याच सेवकांची बहुतेकदा बार मध्येच मैफिल रंगलेली दिसते.अशावेळी बऱ्याच दिवसापासून येथील आरोग्य सेवक गावात दिसेनासे झाले आहेत.समुदाय आरोग्य अधिकारी या उशिरा येवून लवकरच दवाखाना बंद करीत गोंडपिपरी शहराची वाट पकडतात.आजपर्यत त्या फिल्ड वर्क करतांना दिसल्या नाहीत.गावात गृहभेटी तर त्यांच्या झाल्याच नाहीत.
नवीन रुजू झालेल्या आरोग्य सेविका सुध्दा तालुक्याहुन ये-जा करू लागल्या आहेत.काहीक्षण गावात दिसून नंतर कार्यालयीन काम किवा दौऱ्याच्या नावाखाली त्या सुध्दा गाव सोडतात.पावसाळ्यात अशा आपत्तीच्या काळात देखील गावातच राहणारा फायलेरिया वर्कर सुध्दा पडद्याआड लपून बसतो.आरोग्याच्या दृष्टीने सवेदनशिल असलेल्या गावात पुराचे संकट देखील घोंगावत असताना महसूल व आपत्ती विभागाच्या कर्मचा-यांनी अजूनपर्यंत गावात भेट दिली नाही.
ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहाय्यक ग्रा.प.शिपाई आणि पोलिस पाटील यांच्यावर निर्भय राहतात.बसल्या जागी अहवाल बनवून वस्तुस्थिती दडविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.अशावेळी मुख्यालयी राहण्याचा आदेश पायदडी तुडविल्या जात असताना त्यांच्या या बोगस कारनाम्याला जिल्हा व तालुका प्रशासन देखील तेवढेच जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत