अल्ट्राटेकने रस्ता अडविला आणी संजयचा पुरात वाहून जिव गेला
अल्ट्राटेकने रस्ता अडविला आणी संजयचा पुरात वाहून जिव गेला
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने अतिदुर्गम आदिवासी भागातील मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सन 2017 18 मध्ये प्रशासकीय मान्यता देऊन जिवती व गडचंदूर भागातील आदिवासी आठ ते दहा गावासाठी जोडणारा स्वतंत्र पूर्व काळातील हा रस्ता बांधकाम विभागाकडून काम सुरू असताना अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी ने अडविल्यामुळे अर्धवट पडले आहे हा लिंगनडोह येथेच थांबवण्याचा प्रयत्न होता मात्र कंपनी विरुद्ध गावकऱ्यांनी बंड पुकारून स्वतःच मजूर म्हणून काम करीत खदानी पर्यंत पोहोचविला.
मात्र पुढे कंपनीने चुनखडी खदानी तयार करून वयवाटीचा रस्ता नकाशातून बदलूनच टाकला व रस्ते कामाचा घोडा त्याच ठिकाणी अडला नोकरी शिवारातील रस्त्यावर माणिकगड कंपनीने इलेक्ट्रिक जनित्रे रस्त्यावर अवैध बांधकाम तसेच कंपनी कर्मचाऱ्यांसाठी निवासी गाडे बांधकाम करण्यात आले यावरच न थांबता कंपनीने भूपृष्ठ अधिकार नसताना हा रस्ता नाही असे फलकच लावून दिले नाईस नाल्यावर पुलाची आवश्यकता असताना कंपनीने रपटा तयार करून वापर करीत आहे मात्र चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने तसेच पुलाच्या खाली असलेले सिमेंट पाईप दगडामुळे बंद पडल्याने खदानी मधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणाऱ्या दगडाचा खच जमा झाल्याने,
रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने नुकतीच एक घटना घडवून नोकारी येथील संजय, कंडेलवार वाहून गेला व आपल्या जीवाला मुकला असे असताना गोवारी गुडा ते नाल्यापर्यंतचा रस्ता कंपनीने तयार केला नाही व वळण रस्ता तयार करण्यासाठी मात्र कंपनी धडपड करीत मात्र स्वतंत्र पूर्व काळातील वाहिवाटीचा रस्ता गळप करीत लोकांच्या जीवाशी खेळ मांडण्याचा आरोप परिसरातील गावकऱ्यांनी केला मुख्यमंत्री सडक योजनेचे काम मध्येच अडकल्याने लोकांना वाहतुकीला कसरत करावी लागत आहे माईन्स नाल्यावर पुलाचे बांधकाम व अडविलेला अर्धवट रस्ता बांधकाम तातडीने पूर्ण करावे शासनाने या रस्ते विकास कामाकरिता चार कोटी 45 लक्ष निधी उपलब्ध करून दिला असून मात्र 2020 पासून रस्त्याचे काम अडकले असून ठीक ठिकाणी खड्डे पडून पाणी साचले आहे अशी मागणी विजय चव्हाण भावराव कनाके उत्तम पवार नारायण राठोड शंकर आडे यांनी केली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत