Breaking News

श्रावण महिना सुरू होताच विरूर स्टेशन येथील भजन मंडळांनी केली भजनाला सुरुवात

 श्रावण महिना सुरू होताच विरूर स्टेशन येथील भजन मंडळांनी केली भजनाला सुरुवात

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रवीण चिडे, विरूर :  श्रावण महिना सुरू होताच विरूर स्टेशन येथील भजन मंडळांनी केली भजनाला सुरुवात कोविडमुळे सतत दोन वर्ष  निर्बंधामुळे कुणालाही गावकऱ्यांना श्रावण महिन्यात भजन करता आले नाही कोविड चे निर्बंध हडताच गावकऱ्यांनी घरोघरी भजन करण्याकरिता उस्तुक्ता दिसून येत आहे गावात भक्तीमय वातावरण तयार करण्यास भजन मंडळ सुद्धा तत्पर असतात गावातील आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रसंताचे व गाडगे महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असतात.

 सध्या टाळ तबला हार्मोनियम च्या स्वरात गावातील ज्येष्ठापासून तर लहानाच्या मुखात भजनाचे बोल ऐकण्यास मिळतात त्यामुळे गावात भक्तीमय शुद्ध वातावरण निर्माण होताना दिसून येत आहे व आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर  मोरे देविदास खोबरे नामदेव चिडे मंगेश पावडे उमेश मोरे प्रीतम राऊत प्रवीण चिडे दिनेश आत्राम वामन ठमके विनोद ठमके भूषण कडूकर राकेश कडुकर विशाल जीवतोडे हे सर्व गुरुदेव भजन मंडळ कार्यक्रम व राष्ट्रसंतांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करताना दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत