Breaking News

आकाशात काळेकूट ढग पाऊस मात्र रिमझिम

 आकाशात काळेकूट ढग पाऊस मात्र रिमझिम

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सूरज शहाणे, सेलू : सेलू तालुक्यात आकाशात काळेकूट ढग जमा होत असले तरी ग्रामीण भागासह शहरात रिमझिम पाऊसपडत आहे.या रिमझिम पाऊसा मुळे काही अशी शेती पिकांना दिलासा मिळत असला तरी कापूस, सोयाबीन, तूर,मूग, उडीद,आदी पिकावर रोगराई दिसून येत आहे.

रिमझिम पावसामुळं कापसावर मावा पडत असून कापसाचे पाण अखंडत आहेत तर पिकाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही सध्या कापसासह अन्य पिकावर फवारणी करण्याची आवश्यकता निर्मान झालीआहे तसेच ढगाळ वातावरणामुळे लहान मुले वयोवृध दम्या सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत.

तसेच व्हायरल इन्फेकशन यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरू शकते अशी शक्यता अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत