Breaking News

पुस्तकांचे ओझे एक समस्या !

 पुस्तकांचे ओझे एक समस्या !

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे,सेलू : भारतामध्ये मागील काही वर्षांपासून शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल झाला. शैक्षणिक क्षेत्रातील भारताची वाटचाल निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण क्षेत्रात आजवर बरेच निर्णय घेण्यात आलेत आणि दरवर्षी शिक्षण पद्धतीत काही सुधारणा, काही नवीन बदल केल्या जातात. मात्र पुस्तकांच्या ओझ्याबाबत दरवर्षी पालकांकडून नाराजीचा सूर येतो मात्र त्यावर कुठली उपाययोजना होत नाही.

वर्ग पहिली ते नववी पर्यंतच्या शिक्षणामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रांत परीक्षा होते आणि त्यासाठी नियोजित अभ्यासक्रम ठरविला जातो. पुस्तके मात्र संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम गृहीत धरून बनविल्या जातात, प्रथम सत्रांत परीक्षा वेळी पर्यंत द्वितीय सत्रांत अभ्यासक्रमाचा कुठलाही उपयोग होत नाही आणि त्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे ओझे विद्यार्थ्यांना नियमित रित्या घेऊन चालावे लागतात, यामुळे निश्चितच दप्तराचे ओझे वाढते. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रांचा अभ्यासक्रमाचे वेगवेगळे पुस्तके तयार झाली तर निश्चितच दप्तरांचे ओझे निम्मे (अर्धे) होईल.

वर्षाच्या सुरुवातीला एकदाच पुस्तके वितरित करण्यापेक्षा जून महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात असे दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे पुस्तके दोन कालावधीमध्ये वितरित करण्यात यावेत. वेळापत्रक तयार करताना काही उपाययोजना करणे महत्त्वाची ठरते. जी पुस्तके नियमित उपयोगात येतात तीच पुस्तके विद्यार्थ्यांना सोबत आणण्यास सांगणे उचित राहते.अभ्यासक्रम ठरविताना त्यामध्ये अमुलाग्र बदल न करता प्रत्येक पाच वर्षांनी थोडा बदल अपेक्षित ठरतो. दोन सत्रांमध्ये दोन वेळा पुस्तकांची वितरण झाल्यास ओझे कमी होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरू शकते. निश्चितच पुढील सत्रापासून या पद्धतीचा बदल अपेक्षित आहे. 

योगेश पंडित,ह.मु. लू जिल्हा:परभणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत