पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून मिळाली मदत
पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून मिळाली मदत
प्रशासनाचे व एन.डी.आर.एफ.जवानांचे विद्यार्थी व पालक यांनी मानले आभार
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक ठिकाणी घरांत पाणी घूसुन घरे पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.वअनेक गावांना पुराणे वेढा घातला होता.व प्रमुख मार्गासह जिल्हासह तालुक्याचा संपर्क तुटला होता त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथील सिध्दार्थ,विष्णू,मधुरावेणी, आणि गिता अशा या चार विद्यार्थ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं होते. नेटची परिक्षा १७ जुलै २०२२ ची परीक्षा तोंडावर असताना पावसाचे संकट ओढावल्याने जिल्हा मुख्यालय गाठणे कठीण होते.
आणी इतर कोणाशीही संपर्क साधने सुध्दा कठीण होते त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र जिल्हाधिकारी गडचिरोली यांना माहिती मिळताच तात्काळ शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आले व सिरोंचा शिक्षणाधिकारी यांना माहिती मिळताच टेकडा ताला आ. केद्र चे वैद्यकिय अधिकारी डाॅ. सचिन मडावी यांच्याशी संपर्क साधुन यांना कळविण्यात आले माहिती मिळताच तात्काळ पुरामुळे बाहेर येऊ शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांना NEET परीक्षा पासुन वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना संपर्क एन.डी.आर.एफ.च्या जवानांना साहायाने सुखरुप बोरमपली मार्गाने जवानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून परिक्षेला पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली व त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाच्या मदतीने परीक्षा देत येत असल्याने विद्यार्थी व पालकांनी प्रशासनाचे व एन.डी.आर.एफ. जवानांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत