Breaking News

पारनेरच्या पुढाऱ्यांच्याच गावच्या सेवा सोसायट्या बिनविरोध कशा (साट-लोट)..?

 पारनेरच्या पुढाऱ्यांच्याच गावच्या सेवा सोसायट्या बिनविरोध कशा (साट-लोट)..?

  लोकाला लावल झुजांयला पुढारी चाललाय देवाला~अविनाश पवार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दत्ता ठुबे, पारनेर : पारनेर तालुक्यात सध्याची राजकीय परिस्थिती पहाता पारनेर तालुक्यातील चमकोगीरी करणारे सगळे नेते मंडळी पंढरीच्या वाटेवर दिसताहेत हे ऐकल्यावर कुणाला ही आनंदच होणार पण याच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होणारी फोटो वरुन माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्ताला प्रश्न पडतो आहे की ही वेळ का आली बर एक तर स्वतः च पाप धुन्यासाठी म्हणा की झाकण्यासाठी म्हणा स्वतः ला देव समजणारे दिंडी सोबत फोटो सेशन करण्यात धन्यता माणुन खरा बेगडी चेहरा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

 पण पंढरीच्या पाडुंरंगाला तुमचा रंग बदलु पणा ठाव आहे त्यामुळे जे वारकरी आत्मीयतेने खर्या भक्ती भावाने पाडुंरंगा चा जयघोष करत पायी वारी करत वर्षानुवर्षे चालत आहेत त्याच्या भक्तीत व्यत्यय आणत फक्त फोटो शेषन व व्हिडिओ बणऊन बर्याच महाशयांनी तिथे जाऊन चमकोगीरी करुण विठु माऊली सोडुन आपला उद्यो उद्यो सध्या जोरात सुरू केला आहे पण एक लक्षात ठेवा पारनेरच्या पुढार्यानी तालुक्यात कट कारस्थान करुन सर्व सामान्य कार्यकर्ता नः संपविण्याचा प्रयत्न केला तो जनता मुळीच विसरणार नाही पारनेर च्या पुढार्यानी आपल्या स्वतःच्या गावातील निवडणुका बिन विरोध केल्या आणि तालुक्याच्या इतर कार्यकर्तेच्या गावात भावकी- भावकीत,घरा-घरात जे कान फुंकून विष पेरण्याच कामं केलं ते सर्व सामान्य जनता कधीच विसरू शकत नाही त्यामुळेच अता दिंड्या- वार्या करण्याची वेळ आली आहे.

 किती पण चमकोगीरी करा पण पंढरीच्या विठ्ठु माऊली पाडुंरंगाला तुमचं बेगडी रुप माहिती आहे त्यामुळे पंढरीच्या पाडुंरंग चरणी पहिले नतमस्तक होऊन प्रार्थना करा जो काही पारनेर तालुक्यात हौदोस घालून फक्त चमकोगीरी करुण मोह, माया,जालात फसत चाललंय त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा नाहीतर किती पण वारकर्याचे झेंडे पताका हातात घेतली तरी कर्म धुतले जाणार नाही त्यासाठी मोह मायेचा त्याग करावाच लागेल वाल्हांचा वाल्मिकी ॠषी केव्हा झाला याचा अगोदर अभ्यास करा मग वारकरी बांधवांन सोबत पाडुंरंगाचा झेंडा खांद्यावर घ्या असा घनाघाती आरोप मनसेचे तालुका उप अध्यक्ष अविनाश पवार यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत