रोहयो कामात ग्रा. प. बोथली तालुक्यात अव्वल
रोहयो कामात ग्रा. प. बोथली तालुक्यात अव्वल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, लाखांदूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या भात खचरे व नाला सरळी करण कामात या वर्षात मजुरांना सर्वाधिक दिवस हाताला काम देऊन लाखांदुर तालुक्यात अव्वल येण्याचा मान ग्रामपंचायत बोथलीने मिळविला असून अभिनंदनास पात्र ठरली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना रोगाची दहशत असल्याने सर्वत्र रोजगार ठप्प होते.त्यामुळे मजुरांचे काम करणारे हात रिकामे होते.अनेकांनी कोरोना काळात गड्या आपुला गावच बरा हे समजून स्वगाव गाठले होते. मात्र रोजगाराचे साधन नसल्याने कुटूंबाची जबाबदारी पेलवितांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.मात्र मागील वर्षी कोरोनाची दहशत कमी झाल्याने लाखांदुर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मार्फत विविध कामे हाती घेऊन मजूरा ला रोजगार हमी योजने अंतर्गत कामे देण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत बोथली अंतर्गत ५० लाख १४ हजार रुपये मजुरी ,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या मजुरांच्या थेट बॅक खात्यात जमा करण्यात आले. या वर्षी २५०७८ मजुरी/ दिवस निर्माण करण्यात आली आहे. यात दि १ फरवरी २०२२ ते२१/६/२०२२ या कालावधी मध्ये मजुरांना काम देण्यात आले. यात भात खचरे गट क्र १/२५ ते १/४० पर्यंत तर भजन ठवरे ते चुलबंद नदी पर्यंत नाला सरळीकरणं काम करण्यात आले.
१६ इस्टीमेट भात खचरे तर १ इस्टीमेट नालासळलीकरणाचे काम झाले.अश्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून मजुरांच्या हाताला काम देणारी लाखांदुर तालुक्यातील बोथली ग्रामपंचायत चा प्रथम क्रमांक आल्याने ग्रामपंचायत बोथली चे सरपंच कैलास बांडे, सचिव एन ए नंदनवार ,जे ई तरजुले,मार्गदर्शक के सी पटले तसेच रोजगार सेवक श्रावण दहिवले यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत