नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती मिळण्याबद्दल गौरव सोहळा
नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती मिळण्याबद्दल गौरव सोहळा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर : येथील व्हि. एन. के. नगरातील व सध्या देवणी पोलीस स्टेशन येथे सेवेत कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार असलेले नारायण लिंगोजी डप्पडवाड पीएसआय पदी पदोन्नती झाली आहे त्यांच्या सेवेच्या कालावधीत त्यांनी मुरुड , लातूर , उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट कार्य केले असून.
त्यांची पी. आय. एस. पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा व्हि. एन. के. नगरच्या वतिने सत्कार . व्हि. एन. के . नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय राठोड , सचिव सुधाकर मोहिते व उपाध्यक्ष अरविंद धनूरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच पुढील कार्यास त्यांना शुभकामना देण्यात आल्या.
तसेच या वेळी अनिरुद्ध रणसुभे यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला . दोघांनाही अमृतसंदेश ग्रंथ भेट देण्यात आला . याप्रसंगी व्ही. एन. के. नगरीची सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य उपस्थित होते . या कार्यक्रमाची प्रास्ताविक व आभार सहसचिव राजेंद्र सास्तुरकर यांनी मांडले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत