निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या उदगीरच्या पत्रकारांनी केली तेरवी साजरी
निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या उदगीरच्या पत्रकारांनी केली तेरवी साजरी
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर : गेल्या 13 दिवसापासून उदगीर येथील शिवाजी चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंत जोडला जाणारा सिमेंटचा रस्ता हा 100 फुटाचा असताना दोन्ही बाजूने दहा फुटाचा अंतर ठेवून मध्यभागी रस्त्याचे सध्या काम सुरू आहे पूर्व आणि पश्चिम बाजूला काही जणांनी पक्के बांधकाम करून दुकाने व इतर व्यवसाय चालू केले आहेत.
उदगीर शहर हे जगाच्या नकाशावर अती संवेदनशील म्हणून उपजिल्हा चे ठिकाण प्रसिद्ध असून उदगीर येथील मार्केट सीमा वरती भागाला जोडला गेलेला आहे . मुख्य रस्त्यावरून जेष्ठ नागरिकासह इतर सर्वांना याचा खूप त्रास होणार आहे . ही बाब उदगीर येथील पत्रकारांच्या लक्षात आल्यामुळे गेली तेरा दिवसापासून मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन सुरू आहे .
मुख्य रस्त्यावरील पक्के अतिक्रमणे काढल्याशिवाय रस्त्याचे व नालीचे काम सुरू करण्यासाठी हे आंदोलन सुरू असून पत्रकारांच्या शिष्टमंडळाने लातूर येथे जाऊन रस्त्याच्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम अभियंताच्या कार्यालयात सादर केली आहे . वरील कालावधीत कोणत्याही अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष विधले नाही, म्हणून आज निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम अभियंत्याची तेरावी गोड पदार्थांनी शिवाजी चौकात नागरिकांना खिचडी वाटप करण्यात आली .
यावेळी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य तथा स्टार दर्पण न्यूज चे संपादक सुनील हवा यांच्यासह जेष्ठ पत्रकार अंबादास अलमखाने , सोनी , प्राध्यापक गुट्टे , पत्रकार माधव रोडगे , अरविंद पत्की , निवृत्ती जवळे , सचिन शिवशेट्टी , संगम पटवारी , बस्वराज डावळे , सिद्धार्थ सूर्यवंशी , मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार , दत्ता गायकवाड , सुधाकर नाईक , यांच्यासह विश्वकर्मा बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर दापकेकर उपस्थित होते .
या आंदोलनास विविध संघटनेचा पाठिंबा मिळत असून या रस्त्याचे शंभर फूट अंतराच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचे ठरले असुन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा असल्याचे पत्र लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य सुनील हवा यांच्याकडे सुपूर्त केली आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत