Breaking News

मुक्ताईनगर शेतकरी नुकसान पोटी जळगाव येथील उपोषणास पाच दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष

 मुक्ताईनगर शेतकरी नुकसान पोटी जळगाव येथील उपोषणास पाच दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष 

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची भेट

 प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्रीकडे दखल घेण्याची केली मागणी 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दिपक तायडे,रावेर : जळगाव कलेक्टर ऑफिस समोर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुक्ताईनगर घोडसगाव चे शेतकरी श्रीकृष्ण भगत यांच्या व्यथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी उपोसंन स्थळी भेट देवून जाणून घेतल्या.

 त्याचे गेल्या चार वर्षांपासून पुल रस्ताचे काम बंद चुकीचे होत असलेने पाणी शेतात जमून नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना फोन वरून सूचना करून पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन केली. शेतकरी श्रीकृष्ण भगत यांनी आपण पाहिले पत्रकार आणि पक्षाचे नेते आहेत की आमंची मागणी कडे लक्ष देवून पाठपुरावा सुरू केला.राष्ट्रीय जनता दलाचे नेते कार्यकर्ते नेहमी शेतकरी यांचे पाठीशी आहे असे सांगितले यावेळी जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यात शिवाजी महाजन अनिल राठोड आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत