सरस्वती विद्या मंदिर रावेर मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
सरस्वती विद्या मंदिर रावेर मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर : दिनांक 1/8/22 रोजी श्री शिवप्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषणांचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. तर अध्यक्षस्थानी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी प्रांजल चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून वैष्णवी पाटील व सूत्रसंचालन रुचिता महाजन प्रास्ताविक हर्षाली महाजन आभार योगिनी धनायते या विद्यार्थिनींनी मानले.
उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते.भाषणांच्या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक श्री विकास पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तदनंतर विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी हिंदी भाषेतून या दोन्ही नेत्यांविषयी बालपण शिक्षण राजकारण समाजकारण अशा विविध विषयांवर भाषणे दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर उपशिक्षक श्री विनोद पाटील श्री मोहन बारी सौ ललिता राणे श्री उमेश चौधरी श्री राजेंद्र सपकाळ श्रीम उषा चव्हाण श्री चंद्रकांत पाठक श्री नितीन पाठक श्रीम. अनिता सपकाळे अश्विनी गाढे आदी शिक्षक ,पालक, शिपाई श्री जितेंद्र कानुगो उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत