तण नाशकाची भाववाढ बळीराजाच्या जिव्हारी
तण नाशकाची भाववाढ बळीराजाच्या जिव्हारी
पावसाचा वैताग,पिकाची नासाडी
देवा, कुठं नेऊन ठेवली शेती माझी ?
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : अनेक संकटाचा सामना करीत बळीराजा अन्नदाता म्हणून ऊन पाऊस काहीही परवा न करता घाम गाळणाऱ्या बळीराजा आता शेतीसाठी कंटाळला असल्याचे चित्र निर्माण होत असून तरूणानी शेतीकडे पाठ फिरवली गेल्या एक महिन्यापासून सतत होत असलेला धो धो मुसळधार पाऊस उभ्या पिकाची नासाडी पुराच्या पाण्याने जमिनी खडवडल्या लहरी निसर्गामुळे जून महिन्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या वर ओढावले नियमित कर्ज भरूनही पन्नास हजार त्याच्या पदरात अजून पडले नाही.
कोरोना सारख्या संकटातही बळीराजा जीवाची परवा न करता शेतीमध्ये राब राब राबला मात्र शेतीमुळे माती होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी खंत समोर येत आहे मजुराचा संकट खत बी बियाणे औषधी विज बिल असे अनेक संकट शेतकऱ्यांच्या पाठीमागे ससे मीरासारखे लागले असताना दुबार पेरणीच्या संकटातून सावरत नाही तोच अतिवृष्टी पावसाच्या दणक्याने शेतातील उभे पीक होत्याचे नव्हते झाले शासनाने पंचनामे करून तोंडाला पाने पुसले शासनाची अस्थिरता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही.
शेतकऱ्यांनी आता सांगावं कुणाला अशी दुविधा अवस्था शेतकऱ्यांची झाली सततच्या पावसाने शेतामध्ये गवताने डोके वर काढले पिकामध्ये मोठ्या प्रमाणात गवत उभा टाकल्याने मजूर संकटावर मात करावे म्हणून शेतकरी तन नाशकाकडे वळले एक महिन्यापूर्वी तणनाशक या औषधीचे दर प्रति ली 595 होते ते दर 795 झाले दोनशे रुपयाची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चिंतेत भर पडली मात्र पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे शासनाने तेलंगणा राज्याच्या धरतीवर सरसकट सर्व शेतकऱ्यांना सातबारावर नमूद आराजी क्षेत्रावर हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान मंजूर करून मदतीचा हात पुढे करावा तसेच तन नाशकावरील भाव वाढ रोखण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत