वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,बेळगाव जंगल परिसरातील घटना
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,बेळगाव जंगल परिसरातील घटना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली दुर्योधन जयराम ठाकरे वय 49 वर्ष राहणार शिवनी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ही ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलगाव जंगल परिसरात आहे आज ते आपल्या वीस वर्षीय मुलगा आशिष सोबत शेतावर गेले असता मुलगा हा शेळीला चारा तोडण्याकरिता झाडावर चढून फांद्या तोडत होता. दुर्योधन ठाकरे हे खाली फांद्या जमा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना फडफडत नेले बापाला वाघाने ठार केल्याचे थरारक दृश्य पाहून मुलगा पूर्णतः घाबरून गेला उत्तर वनपरिक्षेत्रा मध्ये सदरची घटना घडली.
वाघाने मृतदेह फडफडत नेल्याने मृतदेह हा दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोसंबी कक्ष क्रमांक 175 हद्दीमध्ये आढळून आला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे मात्र वनविभागाकडून वाघाच्या बंदोबस्ताकरिता अध्याप कोणतीही पावले उचलले नसल्याने यावेळी नागरिक वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक झाले होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत